उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यामुळं Govinda ची पत्नी अडचणीत, वाचा काय घडलं

Govinda Wife Sunita Trolled : गोविंदाची पत्नी सुनीता यांचे फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर त्यांना अनेकांनी ट्रोल केलं आहे. दरम्यान, गोविंदा हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. 

दिक्षा पाटील | Updated: May 18, 2023, 03:46 PM IST
उज्जैनच्या  महाकाल मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यामुळं Govinda ची पत्नी अडचणीत, वाचा काय घडलं title=
(Photo Credit : Social Media)

Govinda Wife Sunita Trolled : बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा नेहमीच चर्चेत असतो. गोविंदा हा नेहमची त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो. आता गोविंदा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा हे दोघं नुकतेच उज्जैनला असलेल्या 12 ज्योर्तिलिंगा पैकी एक म्हणजे महाकालच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळ सुनीता तिची पर्स घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यात गेली होती. तिथले अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्या दोघांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत सुनीता आहुजा मंदिराच्या गाभाऱ्यात पर्स घेऊन जाताना दिसली आहे. पण नक्की हे सत्य आणि की अॅनिमेटेड आहे यावर अनेकांमध्ये वाद सुरु आहे. महाकाल मंदिराच्या गाभाऱ्यात बॅग किंवा इतर वस्तू घेऊन जाण्यास मनाई असते. पण मंदिर समितीतील कोणत्याच सदस्यानी सुनीता यांनी केलेल्या या चूकीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे मंदिराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सुनीता आहुजांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर व्हिआयपी ट्रीटमेंटवरून मंदिर प्रशासनावर टीकादेखील केली जात आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या संपूर्ण प्रकरणी मंदिर प्रशासनाकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाणार आहे. जर त्यात काही आक्षेपार्ह आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. सुनीता आहुजा यांनी खरंतर 15 मे रोजी उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शन केले होते. तिथले अनेक फोटो सुनीता यांनी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. 

दरम्याान, सुनीता यांच्या या व्हायरल झालेल्या फोटोत मंदिराच्या गाभाऱ्यात कोणी परवाणगी दिली? त्या शिवाय मंदिरच्या कोणत्याही सदस्यानं त्यांना थांबवलं नाही किंवा असं करण्यापासून थांबवू शकला नाही. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये सुनीता या मंदिराच्या गाभाऱ्यात असताना तिथे पुजारी देखील होते तरी सुद्धा सुनीता यांना कोणी अडवलं नाही. त्यावर अनेकांनी मंदिराच्या सुरक्षेवर प्रश्न उभा केला आहे. 

हेही वाचा : गर्लफ्रेंडसोबत राहण्यासाठी Hrithik Roshan नं खरेदी केलं इतक्या कोटींच घर? किंमत ऐकून बसेल धक्का

महाकाल मंदिराचे व्यवस्थापक संदीप सोनी म्हणाले की बॅग कशी आत गेली? या प्रकरणात आणखी चौकशी होणार आहेत. संदीप सोनीनं सांगितलं की मंदिराच्या बाहेर एक सुरक्षा टीम आहे. त्यांना सांगण्यात आले होते की  मंदिराच्या गाभाऱ्यात कोणालाही बॅग किंवा पर्स घेऊन जाऊ दिले जाणार नाही. संदीप सोनी यांनी पुढे म्हटलं की ज्यानं पण अशी चूक केली असेल त्याच्या विरोधात अॅक्शन घेतली जाईल.