Gudi Padwa 2023: जिजाला उर्मिलानं पटवून दिलं गुढीपाडव्याचं महत्त्व; पाहा VIDEO

Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याचा सण सध्या सगळीच दिमाखात साजरा होतो आहे. तेव्हा अनेक सेलिब्रेटीही (Marathi Celebrity 2023) सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. सध्या अभिनेत्री उर्मिला कोठारे हिनं आपल्या लेकीसह जिजासह (Urmila Kothare Jizah Kothare) एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. 

Updated: Mar 22, 2023, 11:53 AM IST
Gudi Padwa 2023: जिजाला उर्मिलानं पटवून दिलं गुढीपाडव्याचं महत्त्व; पाहा VIDEO
फोटो - उर्मिला कोठारे इन्टाग्राम

Gudi Padwa 2023 Urmila Kothare: गुढीपाडव्याचा सण म्हणजे उत्साहाचा, आनंदाचा आणि नवचैतन्याचा. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर (Gudi Padwa) एव्हाना गुढी उभारून आपल्या सर्वांच्या गुढीची पूजाही झाली असेल. आज गुढीपाडव्याला तुमच्या आवडत्या सेलिब्रेटींनीही मराठमोळा साज कॅरी करत सोशल मीडियावरून (Marathi Celebrity) त्यांच्या चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. यात सगळ्यात जास्त चर्चेत आलेली मराठी सेलिब्रेटी आहे ती म्हणजे उर्मिला कानेटकर-कोठारे (Urmila Kantekar Kothare). सध्या तिचे गुढीपाडव्यानिमित्ताचे खास व्हिडीओशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आपल्या लेकीसोबत जिजासोबत (Jizah Kothare) तिनं गोड व्हिडीओशूट केलं आहे. यामध्ये जिजानं परकर पोलका घातला अशून उर्मिलाचा मराठमोळा साज चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. सध्या या खास शूटचा व्हिडीओ (Urmila Kothare Videos) उर्मिलानं शेअर केला आहे. (Gudi Padwa 2023 Urmila Kothare shares gudipadwa video with her daughter jizah kothare mother daugther celebrates gudipadwa together)

उर्मिलानं आपल्या लेकीसोबतचे हे खास शूट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. उर्मिला आणि जिजा या एकमेकींसोबत आनंदाचे क्षण साजऱ्या करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. उर्मिलानं आणि जिजानं एकत्र मिळून आनंदाची गुडी बांधली. गुढीला ओवाळले आणि त्याची मनोभावे पूजा केली. एका व्हिडीओमध्ये लहान जिजा उर्मिलाला (Urmila Kothare with Jija Kothare) विचारते की, आई आज काय आहे? त्यावर उर्मिला म्हणते की, आज गुढीपाडव्याचा सण आहे. त्यावर जिजा विचारते, गुढीपाडवा म्हणजे काय असतं आई? त्यावर उर्मिला जिजाला गुढीपाडव्याचे महत्त्व समजावून सांगते. 

गुढीपाडव्याच्या निमित्तानं यावेळी उर्मिला पारंपारिक मराठी वेशभूषा परिधान (Marathi Traditional Look) केली होती. केसांना अंबाडा, त्यावर गजरा, मोत्यांचे दागिने, बांगड्या, कानातले, नथ आणि सुंदर अशी मेहेंदी कलरची साडी परिधान केली होती. तर जिजानं उर्मिलाच्याच साडीच्या रंगाचा आणि डिझाईनचा परकर पोलका घातला होता आणि सोबतच मोत्यांचे दागिने परिधान केले होते आणि दोन वेण्या घातल्या होत्या. या रूपात जिजा खूपच सुंदर दिसत होती. सध्या या व्हिडीओला उर्मिलाचे चाहते भरपूर कमेंट्स आणि लाईक्स देताना दिसत आहेत. 

'अथांग' या वेबसिरिजमध्ये उर्मिलानं भूमिका केली होती. तिच्या भुमिकेचेही खूप कौतुक झाले होते. उर्मिला सोशल मीडियावरही सक्रिय असते व अनेकदा ती तिचे आणि जिजाचे गोड फोटोज शेअर करत असते. त्यांच्या फोटोंना आणि व्हिडीओलाही प्रचंड लाईक्स आणि व्ह्युज मिळतात. आदिनाथही (Adinath Kothare Upcoming Movie) आपल्या जिजाचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करतो. जिजाचा क्यूटनेस (Jizah Cute VIDEO) पाहून चाहत्यांनी भरपूर कमेंट्स करण्याचा मोह आवरत नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओतला  जिजाचा क्यूटनेस पाहून सगळेच घायाळ झाले आहेत. तुम्हीही हा व्हिडीओ पाहिलात का?