'जवान', 'पठान' आणि 'अॅनिमल' हे सर्वाधिक कमाई करणारे सिनेमे ठरले. '१२वी फेल' आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहाणी' यासारख्या आशयाने अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. 2023 हे वर्ष प्रेक्षकांसाठी अनेक चित्रपट घेऊन आले. हे देखील बॉलिवूडसाठी कमबॅकचे वर्ष ठरले आहे, गेल्या तीन वर्षांत दाक्षिणात्य चित्रपटांनी हिंदी बॉक्स ऑफिसवर राज्य केले होते. परंतु यावेळी बॉलिवूड जिंकताना दिसले.
वर्ष संपत असताना. नेटिझन्स 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटांची आणि OTT शोची यादी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. दरम्यान, दिग्दर्शक हंसल मेहता यांनीही त्यांचा वर्षातील सर्वोत्तम सिनेमा निवडला. त्यांचा आवडता सिनेमा हा कोणता ब्लॉकबस्टर किंवा हिट सिनेमा नाही तर हा एक छोटा सिनेमा आहे. जो कोणत्याही प्रमोशनशिवाय नोव्हेंबरमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने काही मोजक्या लोकांची मने जिंकली आहेत.
Three of Us. Film of the year. Entering the new year with inspiration and deep admiration for all those who made this film. Avinash, Shefali, Jaideep, Swanand, Sarita, Sanjay, Varun and everybody thank you for this. Tagging @MatchboxShots to thank all of you on my behalf. A most… pic.twitter.com/HyuejhsuFv
— Hansal Mehta (@mehtahansal) December 30, 2023
हंसल मेहता यांनी शेफाली शाह, जयदीप अहलावत आणि स्वानंद किरकिरे स्टारार आणि अविनाश अरुण दिग्दर्शित 'थ्री ऑफ अस' हा सिनेमा या वर्षातील त्यांचा आवडता चित्रपट म्हणून सांगितले आहे. 'थ्री ऑफ अस' 29 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे या सिनेमाने आता OTT वर प्रेक्षकांच मन जिंकल आहे.
या चित्रपटाचे कौतुक करताना हंसल मेहता यांनी लिहिले, "थ्री ऑफ अस. वर्षातील अतिशय सुंदर चित्रपट. हा चित्रपट बनवणाऱ्या प्रत्येकाच मी मनापासून कौतुक करून नवीन वर्षात प्रवेश करत आहे. त्याबद्दल अविनाश, शेफाली, जयदीप, स्वानंद, सरिता, संजय, वरुण आणि सर्वांचे आभार. माझ्या वतीने, मॅच बॉक्स शॉट्ससाठी मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. जुन्या आठवणींचे सर्वात मऊ, सर्वात उदात्त आणि सुंदर गाणे. दुर्मिळ सौंदर्याचा चित्रपट." हंसलच्या या पोस्टला स्वानंद किरकरे आणि शेफाली शाह यांनी उत्तर दिले आहे.