दुबई : बॉलिवूडची ड्रीम गर्ल यांनी काही गोष्टींबाबत गुप्तता बाळगली आहे. शारजाह आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा (एसआयबीएफ) २०१७ च्या दरमान्य हेमा मालिनी म्हणाल्या की, "उघडलेल्या मुठीपेक्षा बंद मूठ अधिक रंजक असते. एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असल्याने काही गोष्टीत गुप्तता बाळगणे आणि रहस्य टिकवून ठेवणे गरजेचे असते."
त्याचबरोबर त्या म्हणाल्या की, "पूर्वीच्या आणि आताच्या परिस्थितीत फार फरक आहे. आता लोक भावनिकदृष्टया तितके सक्षम नाहीत. या चंदेरी दुनियेचा त्यांच्यावर खूप परिणाम होतो आणि त्याच्या दबावाचे ते बळी होतात. म्हणूनच आपल्याला मजबूत, कणखर व्हायला हवे." तसेच आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी स्वप्नं महत्त्वाची असतात किंवा त्यामुळेच आपल्या ध्येयाला दिशा मिळते. म्हणून स्वप्न पाहणं सोडू नका, असेही त्या म्हणाल्या.