आदिवासी पाड्यात रंगला पैठणीचा खेळ

पाहा स्पेशल एपिसोड 

आदिवासी पाड्यात रंगला पैठणीचा खेळ title=

मुंबई : कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं?  दोघांपैकी कोण जास्त चिडतं? मिस्टर फिरायला नेतात का? असे खुमासदार प्रश्न विचारत घराघरात रंगणाऱ्या होममिनिस्टरचा फॅनक्लब चांगलाच वाढला आहे. गेली १४ वर्ष हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या घराघरात पोहोचला असून सगळ्यांचं अविरत मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य घरातील वहिनींपासून ते सेलिब्रिटी सौभाग्यवतींना बोलतं करणाऱ्या या होममिनिस्टरमध्ये दिवाळी निमित्त पैठणीचा खेळ आदिवासी पाड्यात रंगणार आहे.

दिवाळी म्हणजे दिवे आणि रोषणाई. दिवाळीचा प्रत्येक दिवस म्हणजे चविष्ट पदार्थांची रेलचेल आणि नटून थटून तयार होणं. अशा वेळी जर वहिनींना पैठणी मिळाली तर त्याचा आनंद वेगळाच. दिवाळीनिमित्त यावेळी भाऊजी खोपोली चौक फाटा जवळील पिरकड वाडी आणि अर्कस वाडी या आदिवासी पाड्यात गेले आणि तेथील वहिनींसोबत पैठणीचा खेळ खेळाला. जिथे जाण्यासाठी वाहनांची सोय होत नाही अशा ठिकाणी भाऊजी तेथील वहिनींची दिवाळी अजून आनंदी करण्यासाठी गेले.

या वहिनींचा निरागसपणा आणि त्यांचा खडतर प्रवास या भागातून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. खेळ आणि गप्पांसोबत तेथील वहिनींमध्ये साखर, तेल आणि फराळ वाटप करण्यात आले. तेव्हा पाहायला विसरून नका होम मिनिस्टर दिवाळी विशेष ६ ते ९ नोव्हेंबर संध्याकाळी ६.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर