भावोजी निघाले भारत दौऱ्याला... वहिनी तयार आहात ना?

1 जानेवारीपासून भारत दौरा सुरू 

Updated: Dec 30, 2019, 12:21 PM IST
भावोजी निघाले भारत दौऱ्याला... वहिनी तयार आहात ना?

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय असलेल्या 'होम मिनिटर' या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर घराघरात पोहोचले. याच माध्यमातून त्यांनी भावोजी अशी ओळख मिळवली. आता हा कार्यक्रम राज्याबाहेर देखील पोहोचणार आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र घेऊन भावोजी भारत दौरा करणार आहेत.

'होम मिनिटर' हा लोकप्रिय कार्यक्रम गेली १५ वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील महिलांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला आहे. पण आता या कार्यक्रमात राज्यातीलच नव्हे तर देशातील महिलांना सुद्धा भाग घेता येणार आहे. आदेश बांदेकर दिल्ली, इंदोर, वाराणसी, राजस्थान, मनाली आणि भारतातील इतर अनेक भागातील वहिनींची भेट घेणार आहेत.  त्यानंतर हा कार्यक्रम सातासमुद्रापार ही जातो का याबाबत देखील अनेकांमध्ये उत्सूकता आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

भावोजींची झाली पॅकिंग, झाली सगळी तयारी, पैठणी घेऊन फिरणार भारतभर स्वारी. #HomeMinister #ZeeMarathi @aadesh_bandekar

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) on

आदेश भाऊजींच्या सूत्रसंचालनामुळे हा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. आता या भारत दौऱ्याची सुरुवात भाऊजी दिल्ली पासून करणार आहेत. म्हणजेच पैठणीचा खेळ दिल्लीत रंगणार आहे. होम मिनिस्टरचा हा भारत दौरा प्रेक्षक १ जानेवारी पासून पाहू शकतील. 

आतापर्यंत होम मिनिस्टरचा महाराष्ट्र दौरा झाला होता. पण आता महाराष्ट्राबाहेरील वहिनींना भेटायला खास आदेश बांदेकर येत आहेत. आदेश बांदेकरांना या कार्यक्रमामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. आदेश बांदेकर यांना संपूर्ण महाराष्ट्र 'भावोजी' या नावाने ओळखतात.