अखेर शाहरुख खान म्हणाला, 'मी एक चांगला वडील नाही...'

मुलांना वेळ देवू शकत नसल्यामुळे किंग खानच्या मनात अनेक प्रश्न

Updated: Oct 15, 2021, 09:00 AM IST
अखेर शाहरुख खान म्हणाला, 'मी एक चांगला वडील नाही...' title=

मुंबई : अभिनेता शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून मोठा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. गुरूवारी झालेल्या सुनावणीनंतर आर्यनला आणखी पाच दिवस तुरूंगात काढावे लागणार आहेत. त्यानंतर याप्रकरणी काय निकाल लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान शाहरूख कायम त्याच्या तीन मुलांबद्दल बोलत असतो. पण एकदा शाहरुख खानने लहान मुलगा अब्रामबद्दल सांगितले होते की त्याने एक दिवस अब्रामला बोलावले पण तो शाहरुखकडे आला नाही. त्यानंतर शाहरुखच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. 

शाहरुख खानने एकदा माध्यमांसोबत बोलताना सांगितले- 'मी एक दिवस अब्रामसोबत बसलो होतो. मी त्याला माझ्या जवळ बसायला सांगितले. पण तो तिथून निघून गेला, माझ्या जवळ येऊन बसला नाही. म्हणून मी असे विचार करू लागलो की मी एक चांगला वडील नाही! मी माझ्या मुलांवर प्रेम केलं नाही?

पुढे शाहरुख म्हणाला, 'मी माझ्या कामाला जास्त वेळ देतो का? मी मुलांना वेळ देऊ शकत नाही. एक दिवस तो एका मुलीसोबत उभा राहील आणि मला सोडून जाईल...' दुसऱ्या मुलाखतीत शाहरुख खानने आपल्या मुलांबद्दल एक गोष्टी शेअर केली. डीएनएला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख म्हणाला होता की तो अजिबात प्रोटेक्टिव्ह वडील नाही.

शाहरूख दिसताना प्रचंड प्रोटेक्टिव्ह दिसतो, पण तो तसा मुळीचं नाही. शाहरुखने सांगितले की, 'मी प्रोटेक्टिव्ह वडिलांसारखा दिसतो पण तसे नाही. त्यांच्या आयुष्याचे निर्णय मी घेवू शकत नाही... शाहरुखचे मुलं कायम चर्चेत असतात. पण आता संपूर्ण खान कुटुंब मोठ्या अडचणीत सापडलं आहे.