असं असतं तर कोणाकडून पैशांची मदत मागितली नसती..., Arjun Kapoorचं ट्रोलर्सला उत्तर

अर्जुन त्यांच्या चित्रपटांमुळे नाही तर अभिनेत्री मलायका अरोरासोबत असलेल्या नात्यामुळे जास्त चर्चेत असतो.  

Updated: Apr 16, 2021, 01:08 PM IST
असं असतं तर कोणाकडून  पैशांची मदत मागितली नसती..., Arjun Kapoorचं ट्रोलर्सला उत्तर  title=

मुंबई : अभिनेता अर्जुन कपूरने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्य़ातील काही चित्रपट हिट ठरले तर काहींना मात्र अपयशाचा सामना करावा लागला. खरं तर अर्जुन त्यांच्या चित्रपटांमुळे नाही तर अभिनेत्री मलायका अरोरासोबत असलेल्या नात्यामुळे जास्त चर्चेत असतो. पण आता सध्या तो एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. अर्जुनने सोशल मीडियावर एका लहान मुलाचा फोटो पोस्ट करत मदत मागितली. त्यामुळे त्याला आता  ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 

अर्जुनने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘हा लहान मुलगा गंभीर आजाराने त्रस्त आहे. त्याच्या उपचारासाठी  पैशाची गरज आहे. त्यामुळे मदत करा.’ असं लिहिलं आहे. शिवाय डोनेशन लिंक पाठवली आहे. अर्जुनची ही पोस्ट पाहाताच नेटकऱ्यांनी अर्जुनला धारेवर धरलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

यावर नेटकऱ्यांनी तुला मदतीची गरज काय? असं म्हणतं ट्रोल केलं आहे. ‘तुला मदत मागायची गरज काय? तुझी फक्त एका दिवसाची कमाई मुलावर खर्च कर, मुलाचा जीव वाचेल. असं एका युजरने लिहिलं आहे. अशा अनेक कमेंट अर्रजुनच्या पोस्टवर येत आहेत. 

यावर अर्जुनने देखील ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘माझी एक दिवसांची कमाई 16 कोटी असती तर मला पोस्ट टाकायची गरज भासली नसती. मी 16 कोटींची मदत करू शकत नाही. माझ्या परीने मी सर्व मदत केली आहे. मुलाला चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. तुम्ही देखील त्यांची मदत करू शकता. मला ट्रोल करण्यापेक्षा..’