Income Tax विभागाकडून 'या' कारणासाठी अक्षय कुमार सन्मानित, कारणं असं , जे जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. 

Updated: Jul 24, 2022, 06:47 PM IST
Income Tax विभागाकडून 'या' कारणासाठी अक्षय कुमार सन्मानित, कारणं असं , जे जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य title=

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार त्याच्या अॅक्शनसोबतच फिटनेससाठी ओळखला जातो. बॉलिवूडचा खिलाडी कुमार अशा अभिनेत्यांपैकी एक आहे जो दरवर्षी अनेक चित्रपट करतो. चित्रपट हिट किंवा फ्लॉप झाला तरी अक्षय हा वेळेवर कर भरतो. यामुळेच अक्षय कुमार इंडस्ट्रीत सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या कलाकारांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. यावेळीही अक्षय हा सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला आहे, ज्यासाठी त्याला Income Tax विभागाने सन्मानित केले आहे.

याची माहिती इन्स्टंट बॉलिवूड न्यूज या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. अक्षयला मिळालेल्या पुरस्काराचा फोटो या या पेजवर शेअर करण्यात आला आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अक्षय सध्या टिनू देसाई दिग्दर्शित चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या शूटिंगासाठी तो लंडनमध्ये गेला आहे. दरम्यान, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षयला Income Tax विभागाने  पाठवलेले सन्मानपत्र मिळाल्याचे वृत्त समोर येत आहे. हे पत्र Income Tax विभागाने अभिनेत्याला वर्षातील सर्वाधिक कर भरण्यासाठी दिले आहे. अक्षयला हा सन्मान देण्याची ही पहिलीच वेळ नाही, कारण गेल्या 5 वर्षांपासून हा अभिनेता भारतातील सर्वाधिक कर भरणाऱ्यांपैकी एक आहे.

2018 मध्ये, अक्षय कुमार जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सातव्या क्रमांकावर होता. त्यानंतर फोर्ब्स मॅग्झीनंने त्याला आपल्या यादीत सातव्या क्रमांकावर ठेवले. त्याच्या एका चित्रपटाची फीही कोटींमध्ये आहे. रिपोर्ट्सनुसार, अक्षयने त्याच्या शेवटच्या रिलीज झालेल्या 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटासाठी 60 कोटी रुपये मानधन म्हणून घेतले होते. त्याचप्रमाणे एका जाहिरातीसाठी तो 8 ते 10 कोटी रुपये घेतो.

अक्षय लवकरच जसवंत सिंग गिल यांच्या बायोपिकसाठी इंग्लंडमध्ये शूटिंग करताना दिसणार आहे. याशिवाय त्याचा पुढचा 'रक्षा बंधन' हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज असून 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. याशिवाय अक्षयच्या आगामी चित्रपटांच्या यादीत 'सेल्फी', 'राम सेतू', 'ओह माय गॉड 2' आणि 'बडे मियाँ छोटे मियाँ' यांचाही समावेश आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर अक्षय दाक्षिणात्य अभिनेता सुरियाच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'सूरोराई पोत्रू' या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे.