Arunitaसाठी किती स्पेशल आहे Pawandeep Rajan? गायिकेच्या उत्तराने जिंकले सगळ्यांचे मन, पाहा व्हिडीओ

 पवनदीप तिच्यासाठी एक मित्र आणि करिअर म्हणून किती महत्वाचा आहे, तेव्हा अरुणिता म्हणाली...

Updated: Sep 23, 2021, 08:06 PM IST
Arunitaसाठी किती स्पेशल आहे Pawandeep Rajan? गायिकेच्या उत्तराने जिंकले सगळ्यांचे मन, पाहा व्हिडीओ

मुंबई : 'इंडियन आयडॉल 12' मध्ये दिसलेल्या अरुणिता कांजीलाल आणि पवनदीप राजन यांनी त्यांच्या मैत्री आणि लिंक-अपच्या बातम्यांवर अनेक वेळा प्रतिक्रिया दिल्या आहेत, शोदरम्यान देखील या दोघांच्या रिलेशनची चर्चा झाली. परंतु शोनंतर देखील अनेक ठिकाणी हे दोघेही एकत्र दिसले. ज्यामुळे सोशल मीडियावर देखील या दोघांच्या नात्याविषयी खूप चर्चा सुरू आहे. त्यांच्या काही चाहत्यांनी त्यांनी खऱ्या आयुष्यात एकत्र यावे अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे. परंतु अरुणिता आणि पवनदीप एकमेकांना चांगले मित्र मानतात.

पवनदीप आणि अरुणिता लवकरच एका गाण्यात एकत्र दिसणार आहेत, ज्याचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या गाण्यात शनमुखप्रिया (Shanmukhapriya) देखील त्याच्यासोबत असेल. टीझर लॉन्चच्या वेळी, आरजे सिद्धार्थ काननने अरुणिता आणि पवनदीप यांच्याकडून त्यांच्या मैत्रीविषयी मजेदार काही प्रश्न विचारले.

जेव्हा सिद्धार्थ काननने अरुणिताला विचारले की पवनदीप तिच्यासाठी एक मित्र आणि करिअर म्हणून किती महत्वाचा आहे, तेव्हा अरुणिता म्हणाली, "जेव्हा आम्ही एकत्र संगीत करतो, तेव्हा मला ते सर्वकाही जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. हे कसे होते, ते कसे होते. मी नेहमीच विचारत असते. याला (पवनदीप राजन) अनेक वाद्य वाजवायला येतो. तो हार्मोनियम डेस्कवर तबलाही वाजवतो. म्हणून हे सर्व पाहून आणि जाणून घेत असता आमच्यात मैत्री वाढली आणि आम्ही चांगले मित्र झालो."

अरुणिता-पवनदीपच्या मैत्रीमध्ये काय विशेष आहे?

दुसरीकडे, जेव्हा पवनदीप राजनला विचारण्यात आले की, अशी कोणती गोष्ट आहे जी त्याची आणि अरुणिताची मैत्री खास बनवते, तेव्हा पवनदीप म्हणाला, 'आमची मैत्री ही संगीताची मैत्री आहे. मी तिच्याकडून खूप काही शिकतो. ती एक अप्रतिम गायिका आहे. एकदा आम्ही जॅमिंग सेशन करत होतो आणि पाहिले की, ती खूप आश्चर्यकारकपणे गात आहे. ती एक हुशार कलाकार आहे."

सर्वात तापट स्वभावाचा कोण आहे?

या दरम्यान, सिद्धार्थ कनन ने अरुणिता, पवनदीप आणि शनमुखप्रिया यांना एक मजेदार प्रश्न विचारला, ज्याचे उत्तर ऐकल्यावर पवनदीप थोडा रागावला. तिघांमध्ये सर्वात तापट स्वभावाचा कोण आहे असे विचारल्यावर अरुणिताने पवनदीपचे नाव घेतले. हे ऐकून पवनदीप लगेच अरुणिताला म्हणाला, 'तुला कसे कळते? मी तुझ्यावर कधीच रागावलो नाही?'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'इंडियन आयडल 12' पवनदीप राजनने जिंकला होता, तर अरुणिता कांजीलाल शोची पहिली उपविजेती होती. शो संपला आहे आणि पवनदीप-अरुणिता पुढील प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत.