बॉयफ्रेंडसोबत फोटो पोस्ट करत आमिरची लेक म्हणाली 'लॉकडाऊनसाठी तयार'.. पाहा फोटो

इराचा बॉयफ्रेंड आमिर खानचा फिटनेस कोच...      

Updated: Apr 8, 2021, 06:41 PM IST
बॉयफ्रेंडसोबत फोटो पोस्ट करत आमिरची लेक म्हणाली 'लॉकडाऊनसाठी तयार'.. पाहा फोटो title=

मुंबई : आमिर खानची मुलगी इरा खान कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. इरा खान आज चर्चेत आली ती तिच्या लव लाइफमुळे.  इरा खानने फेब्रुवारी 2021रोजी बॉयफ्रेंड नूपुर शिखारेसोबत असलेल्या तिच्या नात्याला दुजोरा दिला. दोघे लव्हबर्ड्स कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांच्या फोटो आणि व्हिडिओंना चाहत्यांकडून प्रचंड प्रेमही मिळतं. इराने सध्या बॉयफ्रेंडसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये बॉयफ्रेंड नूपुर शिखारेसोबत फोटो शेअर करत तिने 'लॉकडाऊनसाठी तयार...' असं देखील लिहिलं आहे.  सांगायचं झालं तर इराने  व्हेलेंटाईन डेच्या आधी तिच्या आणि नूपुरच्या नात्याची अधिकृत घोषणा केली.  इशा कायम बॉयफ्रेंडसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. इरा एक अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची यादी फार मोठी आहे. 

कोण आहे नूपुर शिखारे ?
नूपुर शिखारे आमिर खानचा फिटनेस कोच आहे. पिंकव्हिलाने दिलेल्या रिपोर्टनुसार लॉकडाऊनच्या काळात जेव्हा इराने स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा इरा आणि नूपुर यांच्यातील नातं फुललं. त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र पसरू लागली.