ऐश्वर्या तुमची शाळेतली मैत्रीण आहे का? जेव्हा सुनेच्या समोर माध्यमांवर भडकली होती जया बच्चन

ऐश्वर्या तुमची शालेय मैत्रिण आहे का? जेव्हा सुनेच्या समोर माध्यमांवर भडकली होती जया बच्चन

Updated: Apr 13, 2021, 10:26 PM IST
ऐश्वर्या तुमची शाळेतली मैत्रीण आहे का? जेव्हा सुनेच्या समोर माध्यमांवर भडकली होती जया बच्चन

मुंबई : ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबाची सून आहे. 2007 मध्ये ऐश्वर्याने अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं. ऐश्वर्याची तिची सासू जया बच्चनसोबत खूप चांगली बॉन्डिंग आहे. एकदा जया बच्चन ऐश्वर्यावर वाईट रीतीने भडकली होती.

हे प्रकरण आहे 2013मधील. त्यावेळी जया बच्चन आणि ऐश्वर्या राय सुभाष घई यांच्या पार्टीत पोहोचल्या होत्या. पार्टी संपल्यानंतर काही फोटोग्राफर पार्टीतून घरी परतताना या दोघींना फोटो काढायची रिक्वेस्ट केली होती. कॅमेर्‍या मेन्सने ऐश्वर्याला तिच्या नावाने आवाज देऊन फोटो काढण्याची विनंती करण्यास सुरवात केली. काहींनी ऐश्वर्याला ऐश म्हटलं. आपल्या सुनेसाठी ऐश हा शब्द ऐकून जया बच्चन भयंकर चिडल्या आणि फोटोग्राफर्सना सांगू लागल्या, काय कधीपासून ऐश ऐश करत आहात, ऐश म्हणायला ती काय तुमची शाळेतली मैत्रीण आहे का?

जया बच्चन येथेच थांबल्या नाहीत. त्या पुढे म्हणाल्या आपण थोडा आमचा रिस्पेक्ट करायला हवा. तुम्ही ऐश्वर्या मॅम बोलू शकत नाहीत का? जया बच्चन अशा प्रकारे भडकलेली पाहून ऐश्वर्या राय थोडीशी अस्वस्थ दिसत होती. तिने जया बच्चन यांना शांत केलं आणि गाडीत बसून निघून गेले. ऐश्वर्या राय तिच्या सासू जया बच्चनसोबत खूप चांगली बॉन्डिंग शेअर करते. दोघेही बर्‍याचदा प्रसंगी एकमेकांचं कौतुक करताना दिसत असतात.

आराध्याची सगळी कामे ऐश्वर्या स्वतः करते. असं जया बच्चन यांनी सांगितले होतं. ऐश्वर्याला असं वाटतं की तिच्यापेक्षा आपल्या मुलीची चांगली काळजी कोणीच घेऊ शकणार नाही. आराध्याच्या जन्मानंतर मुलाखतीदरम्यान जया बच्चन म्हणाल्या की, ऐश्वर्याने बाहेर जायला हवं असं मला वाटतं. पण आराध्याची काळजी घेण्यावर तिचा कोणावरही विश्वास नाही आणि ती स्वतःची सर्व कामे स्वत: करते. जया बच्चन आणि ऐश्वर्या मेडच्या भरवशावर कधीच आराध्या सोडत नाहीत.

ऐशला आपली सून बनवण्यापूर्वी जयाने एका मुलाखतीत तिचे कौतुक केलं होतं आणि म्हणाल्या होत्या की, हो, माझ्या मुलाने तिच्याशी लग्न करावे अशी माझी इच्छा होती. मला परंपरा आणि संस्कार असलेल्या मुलीशी अभिषेकचं लग्न करायचं होतं. जया बच्चन यांचा असा विश्वास आहे की ऐश्वर्या जितकी सुंदर आहे तितकीच ती जमीनीवरदेखील आहे ... ती एक चांगली सून तसेच एक जबाबदार आई आहे.

ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबाची सून आहे. ... हे संपूर्ण प्रकरण वर्ष 2013चं आहे. ... ऐश्वर्या राय बच्चनने लग्नानंतर चित्रपटांपासून खूप लांब राहिली. तिने आपले सर्व लक्ष कुटुंबावर केंद्रित केलं. आराध्याच्या जन्मानंतर तिने बऱ्याच वर्षेानंतर चित्रपटांत काम करण्यास सुरवात केली.