Indian Idol 12च्या सेटवर जया प्रदा यांची एन्ट्री; सजली गाण्यांची मैफल

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री हेमा मालिनी आणि रेखा यांनी हजेरी लावली होती.

Updated: Apr 21, 2021, 02:47 PM IST
Indian Idol 12च्या सेटवर जया प्रदा यांची एन्ट्री; सजली गाण्यांची मैफल

मुंबई : Indian Idol 12च्या सेटवर काही दिवसांपूर्वी अभिनेत्री हेमा मालिनी आणि रेखा यांनी हजेरी लावली होती. तर आता यंदाच्या आठवड्यात Indian Idol 12च्या सेटवर अभिनेत्री जया  प्रदा उपस्थित राहणार आहे. 80च्या दशकात जया प्रदायांनी चाहत्यांच्या मनात घर केलं. आता या आठवड्यात Indian Idol 12च्या माध्यमातून त्यांच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होणार आहेत. 

सोनी टीव्हीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दानिशाने ‘दे दे प्यार दे’गाणं गाऊन संगीताची मैफल सजवली. तेव्हा जाय प्रदा यांनी दानिशाचं भरभरून कौतुक केलं. त्यानंतर जया यांनी ‘ढपली वाले ढपली बजा’ गाण्यावर ठेका धरला.