ट्विटरनंतर इन्स्टाग्रामने कंगनावर साधला निशाणा; ही वादग्रस्त पोस्ट केली डिलीट

इन्स्टाग्रामने कंगनाची एक पोस्ट डिलीट केली आहे.

Updated: May 9, 2021, 04:25 PM IST
ट्विटरनंतर इन्स्टाग्रामने कंगनावर साधला निशाणा; ही वादग्रस्त पोस्ट केली डिलीट

मुंबई : वादाचा मुकूट कायम आपल्या डोक्यावर मिरवणारी कंगना पुन्हा एकदा नव्या अडचणीत सपडली आहे. ट्विटरनंतर आता इन्स्टाग्रामने कंगनावर निशाणा साधला आहे. इन्स्टाग्रामने कंगनाची एक पोस्ट डिलीट केली आहे. त्यामुळे  कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ट्विटरने कंगनाचं अकाऊंट सस्पेंड केल्यानंतर कंगना इन्स्टाग्रामवर सक्रिय झाली आहे. त्यामुळे आता ट्विटरनंतर इन्स्टाग्राम देखील कंगनाचं अकाऊंट सस्पेंड  करेल का? असा प्रश्न उपस्थितीत केला आहे. 

दरम्याने, कंगनाने एक पोस्ट शेअर करत कोरोना झाल्याची माहिती दिली. तिने कोरोनाला छोटा फ्लू असल्याचं सांगितल्यानंतर इन्स्टाग्रामने हे टोकाचं पाऊल उचलतं कंगनाची पोस्ट डिलीट केली आहे. इन्स्टाग्रामने हे पाऊल उचलल्यानंतर आपण याठिकाणी आठवडाभर देखील टीकू शकत नाही.. अशी प्रतिक्रिया तिने इन्स्टाग्रामला दिली आहे. 

कंगना म्हणाली,'इन्स्टाग्रामने माझी एक पोस्ट डिलीट केली आहे. ज्यामध्ये मी कोरोना संपवण्याची धमकी दिली. एखाद्याच्या भावना दुखावल्या गेल्या. ट्विटरवर दहशतवादी आणि कम्युनिस्टांबद्दल सहानुभूती दाखवण्याचं काम करतं. पण आता कोविडचा फॅनक्लब तगडा आहे. इन्स्टावर दोन दिवस झाले सक्रिय  झाली आहे. पोस्ट डिलीट केली आहे. त्यांमुळे  कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

काय लिहिलं कंगनाने...
फोटो पोस्ट करत कंगनाने कॅप्शनमध्ये, 'गेल्या काही दिवसांपासून थकवा जाणवत होता. म्हणून हिमाचलला जाण्याचा विचार करत होती. त्याआधी कोरोना चाचणी केली. रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे स्वतःला घरीचं आयसोलेट केलं आहे. मला काहीचं कल्पना नव्हती व्हायरस माझ्या शरीरात पार्टी करेल. पण आता मला माहित पडलं आहे. मी व्हायरसला नष्ट करेल..'

कंगना पुढे म्हणाली, 'कोणालाही आपल्यावर वर्चस्व गाजवू देवू नका. जर तुम्ही घाबरलात, तर तो तुम्हाला जास्त घाबरवेल. आता कोरोनाला नष्ट करण्याची वेळ आली आहे..' असं कंगनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.