मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतचा बॉडीगार्ड कुमार हेगडेवर ब्यूटिशियनने बलात्काचा आरोप केला होता. कुमार हेगडेने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. आता कंगना रानौतच्या बॉडीगार्डला कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे. डीएन नगरच्या पोलिसांनी सांगितले की; कुमार 10 दिवसांपासून फरार होता. शनिवारी दुपारी कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील हेग्गदाहल्ली या गावातून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे.
उपनिरीक्षक वीरेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दुसर्या मुलीशी लग्न करण्याच्या एक दिवस आधी हेगडेला पकडले. ब्यूटीशियन म्हणून काम करणार्या 30 वर्षीय महिलेने गेल्या आठवड्यात त्याच्याविरूद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली. या महिलेने सांगितले की ते एकमेकांना आठ वर्षांपासून ओळखतात आणि गेल्या वर्षी जूनमध्ये हेगडेने लग्नासाठी मागणी देखील घातली.
कुमार हेगडेने महिलेला लग्नाचं आमिष दाखूल तिच्यावर बलात्कार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसा पीडित महिला आणि हेगडे गेल्या वर्षी जून महिन्यात शुटींग दरम्यान एकमेकांना भेटले होते. त्यानंतर त्यांच्या भेटीचं प्रेमात रूपांतर झालं. शिवाय दोघे लिव्हइनमध्ये देखील राहत होते.
जेव्हा महिलेने शारीरिक संबंधास नकार दिला, तेव्हा कुमार हेगडेने महिलेवर सक्ती केली. त्याचप्रमाणे हेगडेने 50 हजार रूपये घेतल्याचा आरोप देखील महिलेने केला आहे. आईची प्रकृती स्थिर नसल्याचं कारण सांगत हेगडेने महिलेकडून 50 हजार रूपये घेतले. पण त्यानंतर तो परतलाचं नाही. अखेर त्याला कर्नटकातून अटक करण्यात आली आहे.