कपिल शर्माच्या शोमध्ये नवा कांड, दोन कलाकारांमध्ये 'कोल्ड वॉर'

 सध्या कपिल शर्माचा काळ काही ठीक नाही. अनेक अडचणी त्याच्या समोर ठाकल्या आहेत. त्याच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाही. सुनील ग्रोवरशी वाद, नंतर शोचा टीआरपी घसरला, त्यानंतर तब्येत बिघडल्याने शुटिंग रद्द झाली आणि आता कपिल शर्माच्या टीममधील दोन कलाकारांमध्ये कोल्ड वॉर सुरू झाला आहे. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 27, 2017, 04:02 PM IST
 कपिल शर्माच्या शोमध्ये नवा कांड, दोन कलाकारांमध्ये 'कोल्ड वॉर'  title=

नवी दिल्ली :  सध्या कपिल शर्माचा काळ काही ठीक नाही. अनेक अडचणी त्याच्या समोर ठाकल्या आहेत. त्याच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाही. सुनील ग्रोवरशी वाद, नंतर शोचा टीआरपी घसरला, त्यानंतर तब्येत बिघडल्याने शुटिंग रद्द झाली आणि आता कपिल शर्माच्या टीममधील दोन कलाकारांमध्ये कोल्ड वॉर सुरू झाला आहे. 

किकू आणि भारतीमध्ये वाद 

मीडिया रिपोर्टनुसार द कपिल शर्मा शो च्या दोन महत्त्वाच्या कलाकारांमध्ये वाद सुरू झाला आहे. किकू शर्मा आणि भारती सिंग यांच्यात कोल्ड वॉर सुरू झाला आहे. 

नेहमी कपिल सोबत राहिला किकू 

रिपोर्टनुसार किकू आणि भारती शोमध्ये एकमेकांसोबत काम करण्यात कम्फर्टेबल नाही त्यामुळे दोघांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत. किकू आणि भारती कॉमेडी सर्कसमध्ये एकत्र परफॉर्म करत होते. पण भारतीशी झालेल्या वादानंतर किकूने हा शो सोडला. 

किकू त्या कलाकारांमध्ये सामील आहे. ज्याने कधी कपिलची साथ सोडली नाही. ऑस्ट्रेलियातून परतत असताना विमानात झालेल्या वादानंतर सुनील ग्रोवर, अली असगर आणि सुगंधा मित्राने कपिलची साथ सोडली होती. पण किकू त्याच्यासोबत राहिला होता. 

मिळालेल्या वृत्तानुसार भारतीची शोमध्ये झालेली एन्ट्रीमुळे किकू नाराज आहे. पण सध्या या वृत्ताला भारती आणि किकूने अफवा असल्याचे म्हटले आहे.