मलायका आणि करिनासोबत 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकाला व्हायचं आहे रुममध्ये लॉक

अनेकदा 'हा' दिग्दर्शक करिना आणि मलायकासोबत एकत्र पार्टी करताना दिसला आहे.

Updated: Aug 4, 2021, 08:18 PM IST
मलायका आणि करिनासोबत 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकाला व्हायचं आहे रुममध्ये लॉक

मुंबई : लवकरच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस 15 चा नवा सीझन सुरू होणार आहे. पण यावेळी हा शो टीव्हीवर नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे. त्याचबरोबर सलमान खान ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शो होस्ट करणार नाही. पण बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर हा शो होस्ट करणार आहे.

8 ऑगस्टपासून बिग बॉस ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे. आतापर्यंत शोमध्ये गायिका नेहा भसीनचं नाव निश्चित करण्यात आलं होतं. तर अनेक नावांबाबत अटकळ बांधली जात आहे. करण देखील शोबद्दल खूप उत्सुक आहे. अलीकडेच, त्याच्या एका मुलाखतीत, जेव्हा करणला विचारण्यात आलं की, तो बिग बॉस सारख्या घरात राहू शकतो का? तेव्हा त्याने स्पष्ट केलं की, तो फोनशिवाय एक तासही जगू शकत नाही.

यानंतर, करणला दुसरा प्रश्न विचारण्यात आला की, कोणत्या दोन सेलिब्रिटींसोबत त्याला घरात बंदिस्त राहण्यास आवडेल, यांवर त्याने अभिनेत्री करीना कपूर आणि मलायका अरोरा यांची नावे घेतली. करीना आणि मलायका करणच्या चांगल्या मैत्रिणी आहेत आणि अनेकदा तो यांच्यासोबत एकत्र पार्टी करताना दिसला आहे.

हा कार्यक्रम ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे, ज्यामध्ये दर्शक 24 तास बिग बॉस पाहू शकतील. त्याचवेळी बातम्या येत आहेत की, भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह देखील बिग बॉस 15 मध्ये सामील होऊ शकते.