'दोन शब्द बोलू तरी शकली असतीस', हात मिळवायला नकार दिल्यानं Kareena Kapoor Khan ट्रोल

Kareena Kapoor Khan : करीना कपूर खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. तर अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत तिची बाजू घेतली आहे. करीना यावेळी सैफ सोबत डिनर डेटला गेल्याचे समोर आला आहे. तिथलाच हा व्हिडीओ आहे.

दिक्षा पाटील | Updated: May 7, 2023, 01:14 PM IST
'दोन शब्द बोलू तरी शकली असतीस', हात मिळवायला नकार दिल्यानं Kareena Kapoor Khan ट्रोल title=
(Photo Credit : Instant Bollywood Instagram)

Kareena Kapoor Khan : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीनाचे लाखो चाहते आहेत. करीना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. करीनाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. सध्या करीनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत करीनानं चाहतीसोबत केलेल्या त्या कृत्यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोलिंगचा शिकार झाली आहे. 

करीनाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हूम्पलानं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत करीना पती सैफसोबत बोलत गाडीमधून उतरल्याचे दिसते. तर गाडीतून उतरल्यानंतर करीनाची एक चाहती तिच्याशी हात मिळवण्यासाठी येते. सुरुवातीला करीना तिला नमस्ते करते पण नंतर जेव्हा करीना तिला हात मिळवण्यासाठी जाते तितक्यात काही होतं आणि ती हात मिळवू शकत नाही आणि पुढे निघून जाते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हायरल झालेल्या व्हिडीओत अनेकांनी कमेंट करत करीनानं हे मुद्दामून केल्याचे म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे की करीना त्या महिलेला इग्नोर करते. बरेच लोक करीनाला ट्रोल करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'हाथ मिळवला नाहीस तर नीट नमस्ते तरी करायचा.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'इतका पैसा आणि फेम असण्याचा काय फायदा, जर हे लोक कोणाची रिस्पेक्ट करत नसतील तर.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'या लोकांना भाव द्यायला नको.' तर आणखी एकाने लिहिले, 'तू हात मिळवू नकोस, पण प्रेमाने दोन शब्द बोलू तरी शकतेस ना. तू ते करायला हवे होतेस. पण हे सगळे लोके अत्यंत माजोरडे आहेत.' तर आणखी एकाने लिहिले, 'आजकालच्या अभिनेत्रींना खूप गर्व आला आहे.' करीनाच्या या व्हिडीओ नेटकऱ्यांनी अशा विविध कमेंट केल्या आहेत. तर करीनाच्या चाहत्यांनी कमेंट करत तिची बाजू मांडली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'कोणालाही अचानक हाथ मिळवल्याचे आवडत नाही. ही तिची इच्छा आहे. कमेंट करणारे तुम्ही कोण की तिनं हाथ मिळवायला हवा. जर तुम्हाला कोणालाही अचानक हाथ मिळवायला आवडत असेल तर नक्कीच रस्त्यावर जा आणि लोकांचा हात मिळवा.'

हेही वाचा : कॅमेऱ्यासमोर अनकम्फर्टेबल झाली Malaika ची बहीण अमृता, ट्रोल करत नेटकरी म्हणाले, 'जीम बॉडीला काय झालं?'

करीनाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती सगळ्यात शेवटी लाल सिंह चड्ढा या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता आमिर खान दिसला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. तर लवकरच करीना ही तख्त, वीरे दी वेडिंग 2 आणि द क्रू या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.