सारासोबत काम करण्यास कार्तिकचा नकार

सारा आणि कार्तिकच्या नात्याच्या चर्चा सर्वदूर पसरल्या आहेत.

Updated: Dec 8, 2019, 02:11 PM IST
सारासोबत काम करण्यास कार्तिकचा नकार

मुंबई : बॉलिवूडमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. कधी कोणता चित्रपट कोणाला मिळेल, कोणाचे सूत कोणासोबत जूळेल, ब्रेकअप इत्यादी. पण चाहते त्यांच्या आवडतीच्या कलाकाराच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी कायम उत्सुक असतात. जर ती बातमी अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या नात्याबद्दल असेल तर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचते. 

सारा आणि कार्तिकच्या नात्याच्या चर्चा सर्वदूर पसरल्या आहेत. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होत. पण सध्या त्यांच्यात काही बिनसल्यांचं समोर येत आहे. शिवाय कार्तिकने सारासोबत काम करण्यास देखील नकार दिला.

'लव आज कल २' चित्रपटात हे दोघे एकत्र झळकणार आहे. चित्रपटातील काही भाग शूट करायचा राहिला आहे. पण कार्तिकने दिग्दर्शक इम्तियाज अलीला शूटिंगसाठी येण्यास देखील नकार दिला. चित्रपटाची शुटिंग अंतिम टप्प्यात आहे. 

सूत्रांच्या सांगण्यानुसार, कार्तिक सध्या 'पती पत्नी और वो' चित्रपटात व्यस्त आहे. बॉक्स ऑफिसवर कार्तिकचे विवाहबाह्य संबंध चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. शिवाय तो अनन्याला डेट करत असल्याच्या चर्चा देखील जोर धरत आहे. 

एकंदर पाहाता कार्तिकने सारला चित्रपटाच्या शूटिंगसाठी दिलेला नकार आणि अनन्यासोबत असलेल्या नात्याच्या चर्चा चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग आहे का? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.