पत्नी नव्हे, कोणा वेगळ्याच तरुणीसोबत बिग बींचा Romantic Dance

या क्षणी नेमका किती आनंद झाला होता हे तिचा चेहरा पाहताना अगदी स्पष्टपणे दिसत आहे. 

Updated: Oct 26, 2021, 03:14 PM IST
पत्नी नव्हे, कोणा वेगळ्याच तरुणीसोबत बिग बींचा Romantic Dance
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : 'रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है...', असं म्हणत भारदस्त आवाजाचे अमिताभ बच्चन स्क्रीनवर आले की नजर त्यांच्यावरच रोखली जाते. हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक दशकं अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्याप्रमाणेच आपला जोडीदारही रुबाबदार असावा अशीच तरुणींची अपेक्षा. 

अगदी बॉलिवूडमधील काही अभिनेत्रीही याला अपवाद नाहीत. याचाच प्रत्यय आला केबीसी 13 च्या मंचावर. 

'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाच्या मंचावर अमिताभ बच्चन यांच्यासोबत रोमँटीक डान्स करणाऱ्या एका अभिनेत्रीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 

'लुका छुपी' या चित्रपटातील 'दुनिया' या गाण्यावर बिग बींसोबत ताल धरणारी ही अभिनेत्री आहे क्रिती सेनन. 

क्रितीला या क्षणी नेमका किती आनंद झाला होता हे तिचा चेहरा पाहताना अगदी स्पष्टपणे दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kriti (@kritisanon)

क्रितीनं या सुरेख रोमँटीक डान्सचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर बिग बींनीसुद्धा तिच्यासोबतच्या फोटोंचा एक कोलाज शेअर केला. 

बॉलरुम डान्सबाबतच्या आठवणीही त्यांनी शेअर केल्या जेव्हा ते महाविद्यालयात आणि कोलकात्याला होते. त्यांच्या या व्हिडीओला असंख्य लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहे.