मुंबई : सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिंदी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करायला सज्ज झाली आहे.
सारा आणि सुशांतसिंग राजपूत यांनी 'केदारनाथ' या त्यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. हा सिनेमा २१ डिसेंबर २०१८ रोजी रसिकांच्या भेटीला येणार आहे.
अभिषेक कपूर दिग्दर्शित 'केदारनाथ' ही एक प्रेमकथा आहे. या चित्रपटाला २०१३ साली केदारनाथमध्ये आलेल्या महापूराची पार्श्वभूमी आहे. मुंबईत महापूराच्या काही सीन्सचे शुटींग होणार आहे.
महाप्रलय दाखवण्यासाठी केदारनाथ चित्रपटामध्ये व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचीदेखील मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे ही वेळखाऊ प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चित्रपटाची रिलिज डेट पुढे सरकवण्यात आली आहे. त्यानुसार पुढील वर्षाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये केदारनाथ रसिकांच्या भेटीला येणार आहे.