अभिनेत्रीला स्टंटबाजी महागात; Reality Show दरम्यान प्रायव्हेट पार्टवर किड्यांचा हल्ला

Nyrraa Banerj : नायरा बॅनर्जीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे की तिला या रिअॅलिटी शोमध्ये स्टंट करत असताना तिला किती त्रास झाला हे सांगितलं आहे. स्टंट करत असताना तिच्या प्रायव्हेट प्रार्टवर कीड्यांनी हल्ला करत जखमा केल्याचे तिनं सांगितले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 25, 2023, 12:18 PM IST
अभिनेत्रीला स्टंटबाजी महागात; Reality Show दरम्यान प्रायव्हेट पार्टवर किड्यांचा हल्ला title=
(Photo Credit : Nyrraa M Banerji Instagram)

Nyrraa Banerj : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री नायरा बॅनर्जी ही चांगलीच चर्चेत असते. नायरा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर नायराचे लाखो चाहते आहेत. तिचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच चर्चेत होतात. सध्या नायरा ही दाक्षिण आफ्रिकेत सध्या 'खतरो के खिलाडी' या रिअॅलिटी शोच्या 13 व्या सीजनचे चित्रकरण सुरु आहेत. या शोच्या शूटिंग दरम्यान, सगळे स्पर्धक हे त्यांचे त्यांचे टास्क पूर्ण करताना दिसतात. बऱ्याचवेळा स्पर्धकांना जखमा देखील होतात. आता या सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे या शोमध्ये असलेली अभिनेत्री नायरा बॅनर्जीनं खुलासा केला की टास्क दरम्यान, तिच्यावर कीडे टाकण्यात आले जे तिच्या संपूर्ण शरीरावर पसरले. इतकंच काय तर या किड्यांमुळे तिच्या प्रायव्हेट पार्टला जखमा झाल्या आहेत आणि तिची परिस्थिती खूप गंभीर झाली आहे. 

'ईटाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत नायरा बॅनर्जीनं खुलासा केला की स्टंट करत असताना तिच्या अंगावर किडे टाकण्यात आले होते. जेव्हा हे किडे आमच्या अंगावर टाकण्यात आले तेव्हा ते आमच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागावर जातात. नायरानं सांगितलं की यावेळी ही किडे तिच्या प्रायव्हेच पार्ट पर्यंत पोहोचले आणि त्यामुळे तिला गंभीर जखमा झाल्या आहेत. सध्या ती ठीक असली तरी किड्यांमुळे तिला वेदना होत आहेत. तिला उठायला बसताना देखील त्रास होत होता. तिच्यासाठी हा टास्क खूप भयानक होता असं तिनं यावेळी सांगितलं. तिला खूप मोठा शॉक लागला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नायराच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं पिशाचिनी या मालिकेत काम केले आहे. नायरानं तिच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली. तर तिनं तिची लोकप्रिय असलेली मालिका पिशाचिनी सोडत खतरो कें खिलाडीमध्ये येण्याचा निर्णय घेतला. तिला स्वत: ला काही वेगळं करताना पाहायचं होतं. इतकंच काय तर तिच्या खासगी आयुष्यात तिला काही करायचं होतं. तिला तिच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडत असं काही करायचं होतं ज्यामुळे तिला काही अॅटव्हेंचर करते असं वाटेल त्यासोबत एक नवीन अनुभव येईल. 

हेही वाचा : Farhan Akhtar च्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा त्याच्यावर जीव जडला आणि मग...

कोणत्याही स्पर्धकाला दुखाप होण्याची ही पहिलीच वेळ नाही तर या आधी देखील अनेक सेलिब्रिटी स्पर्धकांना दुखापत झाली आहे. काही दिवसांपूर्वी खतरो के खिलाडी या शोमधील सेलिब्रिटी स्पर्धक ऐश्वर्या शर्मानं तिला दुखापत झाल्याचे सांगितले होते. यावेळी तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हा खुलासा केला होता. तिनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये ऐश्वर्याचा हात पूर्ण निळसर झाला होता. इतकंच नाही तर दुसरी स्पर्धक अर्चना गौतमनं देखील अशीच एक पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी तिनं सांगितलं होतं की टास्क संपल्यानंतर संपूर्ण शरीरात इतकं दुखं लागतं की कळतंच नाही नक्की कुठे दुखत आहे.