'आईसाठी दिवस नसतो तर...', Mother's Day आधी Prabhakar More यांची खास पोस्ट

Prabhakar More Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमधील अभिनेता प्रभाकर मोरे हे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 13, 2023, 04:17 PM IST
'आईसाठी दिवस नसतो तर...', Mother's Day आधी Prabhakar More यांची खास पोस्ट title=
(Photo Credit : Social Media)

Prabhakar More Maharashtrachi Hasyajatra : छोट्या पडद्यावर अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम असतात त्यापैकी एक म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेनं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या कार्यक्रमातील समीर चौगुले, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि त्यातील इतर कलातकार नेहमीच चर्चेत असतात. या कार्यक्रमातील जेष्ठ अभिनेता प्रभाकर मोरे हे सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्रभाकर हे प्रेक्षकांना हसवताना दिसतात. प्रभाकर यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

प्रभाकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या पोस्टवरून प्रभाकर यांचे त्यांच्या आईवर किती प्रेम आहे ते पाहायला मिळत आहे. प्रभाकर यांनी आईचा फोटो शेअर करत 'आईसाठी दिवस नसतो तर आयुष्याचा प्रत्येक दिवसच आईमुळे असतो.' प्रभाकर हे मुळचे रत्नागिरीचे आहेत. 

Maharashtrachi Hasyajatra fame Prabhakar More shares post before mother s day for mom

प्रभाकर मोरे यांच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल या शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले तर महाविद्यालयीन शिक्षण हे डीबीजे कॉलेज चिपळूण येथून पूर्ण केले. प्रभाकर यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ही मराठी नाटकां पासून केली होती. त्यांनी निर्माते आणि लेखक संतोष पवार यांच्या नाटकांतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. आता पर्यंत अनेक नाटकांमध्ये दमदार अभिनय करत प्रभाकर मोरे यांनी सगळ्यांचे मनोरंजन केले होते. प्रभाकर यांनी याशिवाय अभिनेता प्रसाद खांडेकर लिखित नाटकांमध्येही अभिनय केला आहे. प्रसाद खांडेकर आणि प्रभाकर मोरे यांची मैत्री ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ च्या आधीपासून आहे.

हेही वाचा : 'लहाण मुलं आवडतात पण...', लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्री Amruta Subhash नं का घेतला बाळ न होऊ देण्याचा निर्णय

प्रभाकर या्च्या चित्रपटातील करिअरविषयी बोलायचे झाले तर त्यांनी 2012 साली प्रदर्शित झालेल्या ‘कुटुंब’ या मराठी चित्रपटामध्ये अभिनय केला होता. त्यानंतर प्रभाकर यांनी 2015 साली प्रदर्शित झालेल्या 'बाई ग बाई' या चित्रपटांमध्ये काम केलं. याशिवाय 2018 साली प्रभाकर यांचा बारायण हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याशिवाय लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या 'भाई व्यक्ती की वल्ली' या चित्रपटांमध्ये पण अभिनय केला होता. याशिवाय प्रभाकर हे सोनी मराठीवर असलेल्या कॉमेडीची बुलेट ट्रेन मध्ये भाग घेतला होता.आता प्रभाकर मोरे हे सोनी मराठी वरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या मराठी रियालिटी शोमध्ये आपल्याला कॉमेडी करताना दिसत आहे