"चार चित्रपट केले तरी काम मिळत नव्हतं म्हणून मी...", 'हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा मोठा खुलासा

Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी कार्यक्रमातील या अभिनेत्यानं करिअरच्या सुरुवातीला चार चित्रपट केल्यानंतर काम मिळत नव्हतं या विषयी सांगताना एक खुलासा केला आहे. त्यानं नोकरी केली आणि त्यातून मिळालेल्या पहिल्या पगाराचं काय केलं ते सांगितलं. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 7, 2023, 03:20 PM IST
"चार चित्रपट केले तरी काम मिळत नव्हतं म्हणून मी...", 'हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा मोठा खुलासा title=
(Photo Credit : PRITHVIK PRATAP Instagram)

Prithvik Pratap : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. या कार्यक्रमानं सगळ्यांना हसवून खिळवलं आहे. अगदी सामान्य कुटुंबातील कलाकारांनी या कार्यक्रमातून यश मिळवलं. आज त्यांना लाखो लोक ओळखत असून त्यांना वेगवेगळ्या ऑफर मिळतात.  या कार्यक्रमातील लोकप्रिय अभिनेता पृथ्वीक प्रताप याचे देखील आज लाखो चाहते आहेत. पण तुम्हाला माहितीये एक काळ असा होता जेव्हा पृथ्वीक प्रतापनं अनेक चित्रपट केले असून एककाळ असा होता जेव्हा त्याला काम मिळत नव्हतं. असं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 

पृथ्वीकनं ‘संपूर्ण स्वराज’ला नुकतीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत पृथ्वीकनं त्याच्या आडनाववरून कशा प्रकारे त्याला 5 मुलींनी नकार दिला याविषयी सांगितलं. तर त्यासोबतच त्यानं त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या संघर्षाविषयी सांगितलं. पृथ्वीक त्याच्या करिअरविषयी सांगताना म्हणाला, मी 2007-2008 पासून अभिनयक्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. तर 2013-14 च्या दरम्यान मी चार चित्रपट केले. ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘नाइट स्कुल’, ‘गांधींची सहा माकडं’ असे काही चित्रपट केले. त्यातल्या दोन चित्रपटांमध्ये तर मी मुख्य भूमिका साकारली होती."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या चित्रपटांविषयी सांगत पृथ्वीक पुढे म्हणाला, "ते चित्रपट अजूनही प्रदर्शित झाले नाहीत. यापुढे ते प्रदर्शित होतील असं मला वाटत नाही. इतर दोन चित्रपटांमध्ये माझ्या अगदी छोट्या भूमिका होत्या. तर 2014 मध्ये चार चित्रपट केले. तरीही त्यानंतर माझ्याकडे काम नव्हतं. म्हणून मी नोकरी करण्याचा निर्णय घेतला”.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे काम मिळावं म्हणून पृथ्वीक संजय जाधव यांच्याकडे गेला होता. याविषयी सांगताना पृथ्वीक म्हणाला, "मला काम हवं होतं म्हणून मी दिग्दर्शक संजय जाधव यांच्याकडे गेलो. त्याच्यांबरोबर मी ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ चित्रपट केला. त्यांच्याकडे कामासाठी मी विचारणा केली. पण सध्यातरी माझ्याकडे तुझ्यासाठी काही काम नाही असं त्यांनी मला सांगितलं होतं.  त्यावेळी संजय जाधव ‘तु ही रे’ चित्रपट करत होते." 

हेही वाचा : ठिकाणही ठरलं... ! Prabhas 'या' पवित्र स्थळी घेणार सप्तपदी; पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात...

मैत्रिणीनं दिला होता नोकरी करण्याचा सल्ला सांगत पृथ्वीक म्हणाला, माझी एक मैत्रिण होती सानिका अभ्यंकर तिनं मला एक सल्ला देत सांगितलं की आता अभिनयक्षेत्रात तुझ्यासाठी काय काम नाही तर तू संजय जाधव यांच्याकडेच नोकरी कर. ड्रिमर्स नावाची पीआर व मार्केटिंग करणारी कंपनी आपण सुरु करत आहोत तर इथे तू इंटर्नशीप कर. तेव्हा माझा पगार ठरला होता आणि तो पण फक्त पाच हजार रुपये.  जेव्हा मला पहिला पाच हजार रुपये पगार मिळाला तेव्हा मी तो खर्च केला".