ठिकाणही ठरलं... ! Prabhas 'या' पवित्र स्थळी घेणार सप्तपदी; पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात...

Prabhas Wedding Venue : आदिपुरुष चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरच्या प्रदर्शनावेळी प्रभासनं त्याच्या लग्नाचे स्थळ सांगितले आहे. प्रभासनं दिलेल्या या माहितीनं त्याच्या सगळ्या चाहत्यांना आनंद झाला आहे. दरम्यान, लवकरच प्रभासचा आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 7, 2023, 12:57 PM IST
ठिकाणही ठरलं... ! Prabhas 'या' पवित्र स्थळी घेणार सप्तपदी; पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात... title=
(Photo Credit : Social Media)

Prabhas : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता प्रभासचा 'आदिपुरुष' हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 10 दिवस आधी निर्मात्यांनी चित्रपटाचा अॅक्शन ट्रेलर प्रदर्शित केला. या ट्रेलरमध्ये आपल्याला श्रीराम ही भूमिका साकारणारा प्रभास, माता सीता ही भूमिका साकारणारी क्रिती सेनन आणि रावणाची भूमिका साकारणारा सैफ अली खान आपल्याला पाहायला मिळाले. या चित्रपटाचा प्रदर्शित झालेला हा दुसरा ट्रेलर चर्चेचा विषय ठरला आहे. पण चित्रपटातील त्याचा लूक किंवा अॅक्शनची सगळ्यात जास्त चर्चा सुरु नाही तर त्यानं या वेळी केलेल्या एका वक्तव्यामुळे आहे. प्रभासनं तिरुपतीत लग्न बंधनात अडकणार असल्याच्या वक्तव्यानंतर पुन्हा एदा त्याच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. 

सलमानप्रमाणेच प्रभास हा दाक्षिणेतील मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. त्यामुळे त्याचे चाहते हे नेहमीच त्याचं रिलेशनशिप स्टेटस जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. नेहमीच त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर शांत असणाऱ्या प्रभासनं यावर वक्तव्य केलं आहे. त्याच्या चाहत्यांच्या सततच्या प्रश्नावर प्रभास उत्तर दिले आहे. 'आदिपुरुष' च्या या अखेरच्या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमा दरम्यान, एका व्यक्तीनं त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला असता. प्रभास मस्करी करत म्हणाला, "मी तिरुपतीत लग्न करेन." दरम्यान, प्रभासनं हे वक्तव्य केलं तेव्हा तिथे क्रिती देखील उपस्थित होती. खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु आहेत. तर प्रभासनं दिलेल्या या उत्तरानं तिथे उपस्थित असलेल्या त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला. 

ट्रेलर रिलीज आधी प्रभास तिरूपती मंदिरात देवाच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी प्रभास पारंपारिक पोशाखात दिसला होता. त्यानं मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात असताना पांढऱ्या रंगाची लुंगी आणि शर्ट परिधान केलं होतं. तर त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी तिथे गर्दी केली होती. 

हेही वाचा : स्मिता पाटील यांच्या आठवणीत Prateik Babbar नं बदललं स्वत:चं नाव...

या कार्यक्रमात प्रभासला त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले होते. या वेळी प्रभासनं मस्करीत त्याच्या चाहत्यांना वचन दिले की आतापासून दरवर्षी तो दोन चित्रपट करत जाईल. इतकंच नाही तर शक्य झाल्यास तो तिसऱ्या चित्रपटावर काम सुरु करेल. प्रभासच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्याला संपूर्ण भारतात 'बाहुबली' आणि 'बाहुबली 2' या चित्रपटांमुळे लोक ओळखू लागले. या चित्रपटांमध्ये असलेली प्रभासच्या भूमिकेनं सगळ्यांची मने जिंकली होती. दरम्यान, प्रभास लवकरच बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहे. 

या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर आदिपुरुष या चित्रपटाची निर्मिती ही ओम राऊत यांनी केली होती. हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित होणार असून तेलगू, तमिळ, कन्नड, हिंदी आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.