मुंबई : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाची चर्चा सर्वत्र रंगताना दिसत आहे. सेलेब्रिटींचे खाजगी आयुष्य असो, नाहीतर व्यावसायिक त्यांच्या चर्चा एक महत्वाचा मुद्दा समजला जातो, आणि त्यांच्या चर्चातर वाऱ्यासारख्या पसरत असतात. विवेकने नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक विनोदी मीम शेअर केले आहे. त्याने शेअर केलेला हा मीम चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे.
Maharashtra Women Commission: Maharashtra State Commission for Woman mulling to take action against actor Vivek Oberoi on his objectionable tweet (on exit polls). pic.twitter.com/rF0sgxqnwx
— ANI (@ANI) May 20, 2019
विवेकने हा मीम शेअर केल्यानंतर महिला आयोगाने या ट्विटची दखल घेत त्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. आता विवेक विरोधात कारवाई होण्याची सुद्धा शक्यता आहे.
अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी केलेल्या ट्विटची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. त्यांना नोटीस बजावली जाईल. त्यांचे ट्विट महिलेचा अनादर करणारे आहे, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे.
Hahacreative! No politics here....just life
Credits : @pavansingh1985 pic.twitter.com/1rPbbXZU8T
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) May 20, 2019
मीममध्ये अभिनेता सलमान खान, विवेक ओबेरॉय आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन दिसत आहे. एक्झिट पोलच्याच पार्श्वभूमीवर या त्रिकुटांचे मीम सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहे.
सलमान खान 'ओपिनियन पोल'तर विवेक 'एक्झिट पोल' असं दर्शवण्यात आले आहे.विवेकच्या या कृतीनंतर त्याच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.