अनुपम खेर यांना मनमोहन सिंह यांचं रूप देणाऱ्या मेकअप आर्टिस्टचं निधन

2020पासून अनेक बड्या कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला. 

Updated: Apr 19, 2021, 08:52 AM IST
अनुपम खेर यांना मनमोहन सिंह यांचं रूप देणाऱ्या मेकअप आर्टिस्टचं निधन

मुंबई : गेल्या कही दिवसांपासून बॉलिवूडला सतत मोठे धक्के बसत आहेत.  2020पासून अनेक बड्या कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला. दरम्यान अभिनेते अनुपम खेर यांना माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं रूप देणाऱ्या मेकअप आर्टिस्टचं निधन झालं.  'द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' चित्रपटातील  अनुपम यांच्या मेकअपचं तुफान कौतुक देखील झालं. त्या मेकअप आर्टिस्ट नाव प्रणय दिपक सावंत असं आहे. प्रणयच्या मृत्यूची बातमी खेर यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून दिली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

इन्स्टाग्रामवर खेर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये प्रणय त्यांचं मेकअप करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ शेअर करत ते म्हणाले, 'एका चांगल्या कामगीरीमागे अनेकांचा मोलाचा  वाटा असतो. 33 वर्षीय प्रणयच्या निधनाने मी अत्यंत दुःखी आहे. तो कायम सेटवर हसत असायचा....' शिवाय त्यांनी प्रणयच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या. 

अनुपम खेर यांच्या या व्हिडिओवर अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. सध्या संपूर्ण जग संकटात आहे. कोरोनाचं वादळ सर्वत्र आहे. महाराष्ट्रा कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात फैलत आहे. त्यामुळे सर्वांना स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.