चित्रपट न करता देखील मलायका अरोरा आहे इतक्या कोटींची मालकिन, रिअॅलिटी शोच्या एका एपिसोडसाठी घेते इतकी रक्कम

मलायकाचा आज 49 वा वाढदिवस आहे. 

Updated: Oct 23, 2022, 06:44 PM IST
चित्रपट न करता देखील मलायका अरोरा आहे इतक्या कोटींची मालकिन, रिअॅलिटी शोच्या एका एपिसोडसाठी घेते इतकी रक्कम title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही 49 वर्षांची असूनही तिच्या सुंदरतेनं सगळ्यांना वेड लावते. मलायक सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच मलायकानं 49 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्तानं अर्जुन कपूरनं मलायकाचा फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मलायकाचं नाव बॉलिवूडमधील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी कोटींची कमाई केली आहे. मलायकाच्या कमाईचे साधन काय आहे, तसेच अभिनेत्रीची एकूण संपत्ती जाणून घ्या.

मलायका टीव्ही शोमधून मोठी कमाई करते, जरी ती चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती रिअॅलिटी शो आणि चित्रपटांमध्ये आयटमनंबर करून मोठी कमाई करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायका रिअॅलिटी शोच्या एका एपिसोडसाठी जवळपास 5 लाख रुपये मानधन घेते. यासोबतच मलायका अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्येही दिसते, ज्यामध्ये अभिनेत्री निर्मात्यांकडून भरमसाठ रक्कमही घेते. (malaika arora celebrates 49 th birthday know her net worth and per episode income) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मलायका मुंबईतील एका उच्चभ्रू परिसरात राहते. तिचं घरहे सी फेसिंग आहे. रिपोर्ट्सनुसार, मलायकाच्या सी-फेसिंग घराची किंमत सुमारे 20 कोटी रुपये आहे. या मोठ्या आलिशान घरात मलायका तिच्या मुलासोबत राहते. 

आलिशान घराशिवाय मलायका अरोराला लक्झरी कारचीही शौकीन आहे. मलायकाच्या कार कलेक्शनमध्ये 1.38 कोटी रुपयांची BMW 7 सीरीज, 20 लाख रुपयांची टोयोटा इनोव्हा क्रिस्टा, 96 लाख रुपयांची BMWX 7 आणि 2.11 कोटी रुपयांची रेंज रोव्हर वोग यांचा समावेश आहे. दुसरीकडे, मलायकाच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री जवळपास 80 कोटींची मालक आहे. मलायकाने अरबाज खानपासून घटस्फोट घेतला आहे आणि सध्या अर्जुन कपूरला डेट करत आहे.