अर्जुनसोबतचा व्हिडीओ शेअर करत मलायका म्हणाली, "रोमँटिक..", संजय कपूरने दिली अशी प्रतिक्रिया

मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अर्जुन कपूरसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Updated: Jul 6, 2022, 04:17 PM IST
अर्जुनसोबतचा व्हिडीओ शेअर करत मलायका म्हणाली, "रोमँटिक..", संजय कपूरने दिली अशी प्रतिक्रिया title=

Malaika Aroro Share Video: अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्यातील प्रेम जगजाहीर आहे. मलायका आणि अर्जुन दोघेही याबाबत सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. आता मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अर्जुन कपूरसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. मलायकाच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांसोबत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. पण सर्वाधिक चर्चा होतंय ती अर्जुन कपूरचे काका संजय कपूर यांच्या कमेंटची. या व्हिडीओ पाहून अर्जुन कपूरचे काका संजय कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मलायका अरोरानं इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, "वातावरण रोमँटिक आहे. अशात एक थ्रोबॅक तर बनतोच". या व्हिडीओत मलायका आणि अर्जुनच्या पॅरीस ट्रीपच्या आठवणी आहेत. आठवड्याभरापूर्वी अर्जुन कपूरचा 37 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोघंही पॅरीसला गेले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ पाहून संजय कपूर यांनाही आपल्या भावना आवरता आल्या नाही. त्यांनी मलायकाच्या व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं आहे की, 'व्वा व्वा..'. संजय कपूर यांची ही कमेंट्स पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याचबरोबर संजय कपूर यांची पत्नी महीप कपूरनेही या व्हिडीओवर कमेंट्स केली आहे.