Live In Relationship : 'या' कोट्याधीश Businessman सोबत Miss World Manushi Chhillar राहते लिव्ह इनमध्ये ?

Manushi Chhillar च्या रिलेशनशिपविषयी मोठी बातमी समोर आली आहे. मानुषी तिच्याहून 14 वर्षे मोठ्या पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये आहेे. 

Updated: Nov 21, 2022, 05:08 PM IST
Live In Relationship : 'या' कोट्याधीश Businessman सोबत Miss World Manushi Chhillar राहते लिव्ह इनमध्ये ?  title=

मुंबई : मिस वर्ल्ड 2017 विजेती मानुषी छिल्लरचे (Manushi Chhillar)  लाखो चाहते आहेत. मानुषी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. बऱ्याचवेळा मानुषी तिनं शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेतही येते. दरम्यान, मानुषी सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. मानुषी ही बिझनेसमनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. (Miss World Manushi Chhillar) 

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, मानुषी ही तिच्या पेक्षा वयानं 14 वर्षांनी मोठ्या असलेल्या बिझनेसमॅनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांचे सुट्टीतील फोटो याचा पुरावा आहेत. (Manushi Chhillar Boyfriend Live In Relationship With Businessman) मानुषी आणि निखिल यांच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलायचे झाले तर दोघेही 2021 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वीच हे दोघं ऋषिकेशला फिरायला गेले होते. (Manushi Chhillar Boyfriend)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रिपोर्टनुसार, 'दोघे सीरियस रिलेशनशिपमध्ये आहेत. ते एकमेकांसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले आहेत. सध्या मानुषी तिच्या बॉलिवूड करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळेच मानुषीनं तिच्या लव्ह लाईफबद्दल कोणाला सांगितले नाही. मानुषीच्या कुटुंबातील आणि मित्रमैत्रिणींनाही याबद्दल माहिती आहे. मात्र, या दोघांना हे नातं एवढ्यात कोणासमोर मांडायचं नाही. (manushi chhillar dating businessman nikhil kamath live in together) 

कोण आहे मानुषीचा बॉयफ्रेंड? 

निखिल कामथ झिरोधा नावाच्या कंपनीचा सह-संस्थापक आहे. निखिल कामत यांचा पहिला घटस्फोट झाला आहे. 18 एप्रिल 2019 रोजी त्यांनी अमांडा पूर्वांकरासोबत फ्लॉरेन्स, इटली येथे लग्न केले, परंतु एका वर्षातच दोघे विभक्त झाले. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचा 2021 मध्ये घटस्फोट झाला. निखिल कामत आणि मानुषी छिल्लर यांनी त्यांच्या नात्याबाबत दुजोरा दिलेला नाही. (Manushi Chhillar Boyfriend Live In Relationship With Businessman Nikhil Kamat)

हेही वाचा : Taarak Mehta Ka Ooltah Chashmah 'बबिता' चा परदेशात गंभीर अपघात, फोटो शेअर करत म्हणाली...

मानुषी छिल्लरनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. काही दिवसांपूर्वी मानुषी अक्षय कुमारसोबत 'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) या चित्रपटात दिसली होती. याच चित्रपटातून मानुषीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मानुषीनं या चित्रपटात अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिका साकारली होती. (Manushi Chhillar With Akshay Kumar)