ईदच्या शुभेच्छा दिल्याने मराठी अभिनेत्री ट्रोल! महाराजांचा दाखला देत दिलं 'असं' उत्तर की ट्रोलर्स झाले गप्प

Ruchira Jadhav trolled: ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या मराठी अभिनेत्रीला ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jun 17, 2024, 08:48 PM IST
ईदच्या शुभेच्छा दिल्याने मराठी अभिनेत्री ट्रोल! महाराजांचा दाखला देत दिलं 'असं' उत्तर की ट्रोलर्स झाले गप्प title=
Ruchira JadhavTroll

Ruchira Jadhav trolled: आज देशभरात ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सर्वजण एकमेकांना ईद मुबारक म्हणत शुभेच्छा देत आहेत. दरम्यान ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या मराठी अभिनेत्रीला ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव हिने ईद निमित्त सोशल मीडियात आपले फोटो शेअर केले. तिने सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. माझ्या इंटरनॅशनल ट्रॅव्हल शो Bollylands.com साठी बहरीनमध्ये शूटिंग करताना खूप आनंद झाला, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. मी येथे सुंदर बहरीनची झलक शेअर करत असल्याचे तिने सांगितले. बहरीन टूर माझ्या हृदयात कोरली गेलीय. यातील ही शेवटची पोस्ट  मी शेअर करत असल्याचे ती म्हणाली. 

या आऊटफीटमुळे मला मुन्नी असल्याचा फील येतोय. मुंज्यावाली मुन्नी नव्हे, बदनाम झालेली मुन्नी नव्हे तर जय श्रीराम वाली मुन्नी असेही तिने पुढे म्हटले.

काय म्हणाले ट्रोलर्स?

यानंतर तिला ट्रोल करण्यात आले. ईद मुबारक वैगेरे कशाला? मराठी सण आहेत एवढे मग हे सण कशाला? असा प्रश्न तिला एका युजरने विचारला.  तुम्हाला एवढा पुळका का येतोय? असेही तिला कमेंट्सच्या माध्यमातून विचारण्यात आले. तर अनेकांनी आपण तुला आतापासून अनफॉलो करत असल्याचे म्हटले आहे. बायोमध्ये धर्मो रक्षति रक्षत: लिहायच आणि इकडे ईदच्या शुभेच्छा द्यायच्या. किती तो विरोधाभास, असे म्हणत रुचिराला ट्रोल करण्यात आलं. पण रुचिराने रोखठोक भूमिका घेत ट्रोलर्सना त्यांच्याच भाषेत समज दिली. 

ट्रोलर्सना काय म्हणाली रुचिरा?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj)

मी डेनिम, स्कार्फ आणि शेड्स असलेली कुर्ती परिधान केली आहे. तो माझा 'पोशाख' आहे. मी माझे काम करत आहे. तुम्हा सर्वांना काय बोलावे हे मला खरेच कळत नाही. कर्म आणि धर्म “पूर्णपणे” समजणाऱ्यांसाठी ही पोस्ट असल्याचे म्हणत तिने छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला तिने दिला. महाराजांचा उल्लेख करणाऱ्यांना विचारायचंय, ‘महाराजांनी कधी दुसऱ्या धर्माचा निरादर करायला शिकवला’? असा प्रश्न तिने ट्रोलर्सना विचारला. 

माझ्या बायोमधील धर्माबाबत प्रश्न उपस्थित तरणाऱ्या गीतेतला कर्मयोग समजला असता, तर तुमची प्रतिक्रिया वेगळी असती, असे ती म्हणाली. तुमच्या भावनांचा आदर आहे.  पण याचा अर्थ असा नाही की तुमचा 'दृष्टीकोन प्रत्येक वेळी योग्य असावा', हरे कृष्णा! असे उत्तर तिने ट्रोलर्सना दिले.