लाईव्ह व्हिडीओदरम्यान साक्षी गांधी गौरी कुलकर्णीला म्हणाली बावळट, नेमकं काय घडलं?

 गौरी कुलकर्णीचा एक व्हिडीओ समोर आले आहे. यात अभिनेत्री साक्षी गांधी ही तिला चालू व्हिडीओदरम्यान बावळट म्हणाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Updated: Feb 15, 2024, 09:04 PM IST
लाईव्ह व्हिडीओदरम्यान साक्षी गांधी गौरी कुलकर्णीला म्हणाली बावळट, नेमकं काय घडलं?  title=

Sakshi Gandhi Gauri Kulkarni Video : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीत आई कुठे काय करते या मालिकेचे नाव कायमच पाहायला मिळते. ही मालिका टीआरपीच्या यादीतही अग्रस्थानी पाहायला मिळते. या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून गौरी कुलकर्णीकडे पाहिले जाते. या मालिकेत तिने गौरी हे पात्र साकारले होते. आता तिचा एक व्हिडीओ समोर आले आहे. यात अभिनेत्री साक्षी गांधी ही तिला चालू व्हिडीओदरम्यान बावळट म्हणाल्याचे पाहायला मिळत आहे. 

गौरी कुलकर्णीने व्हॅलेंटाईन डे निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ

गौरी कुलकर्णी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच गौरीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती व्हॅलेंटाईन डे चे सेलिब्रेशन करताना दिसत आहे. यात ती अभिनेत्री साक्षी गांधीसोबत लाईव्ह व्हिडीओ करताना दिसत आहे. 

हेही वाचा : 'झी मराठी'वर नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, 'ही' जोडी झळकणार प्रमुख भूमिकेत; पाहा प्रोमो

या व्हिडीओच्या सुरुवातीला गौरी म्हणाली, "हाय, आम्ही एकत्र व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतोय. मी आणि साक्षी दोघेही सोबत आहोत. आम्ही व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करण्यासाठी आईस्क्रीम मागवलं आहे." यानंतर गौरी ही साक्षीला कॅमेरा कसा उलट करायचा हे विचारताना दिसत आहे. त्यावर साक्षी तिला यात ते उलट होत नाही बावळट असं म्हणते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gauri (@gaurikulkarni23)

गौरी आणि साक्षीची ऑन कॅमेरा मस्ती

यानंतर ती या व्हिडीओत आईस्क्रीम दाखवत आहे. यात ती साक्षीने खाल्लेलं आईस्क्रीम कोणतं आणि तिने खालेलं कोणतं हे दाखवताना दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना गौरीने व्हॅलेंटाईन स्पेशल, डाएट गेलं तेल लावत, असे म्हटले आहे. त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेक चाहते कमेंट करत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. 

हेही वाचा : कौलारु घर, दारापुढे तुळशी वृंदावन अन्...; रवी जाधव यांच्या कोकणातील घराची झलक पाहिलात का?

दरम्यान साक्षी गांधी ही ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने अवनी हे पात्र साकारले होते. सध्या साक्षी ही सन मराठीवरील नवीन जन्मेन मी या मालिकेत झळकत आहे. तर गौरी कुलकर्णी ही प्रेमास रंग यावे या मालिकेत झळकत आहे. याबरोबरच तिने नेल आर्टचा नवीन बिझनेसही सुरु केला आहे.