close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचा अल्पपरिचय

अचानक एक्सिटमुळे हळहळ 

ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचा अल्पपरिचय

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. विविध मालिकांमध्ये शुभांगी जोशी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ''काहे दिया परदेस' या मालिकेतील शुभांगी जोशी यांनी रेखाटलेली आजी लोकप्रिय होती. त्यांनी मुंबईतील कपाडिया रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. शुभांगी जोशी या ७२ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई आणि तीन नातवंडे असा परिवार आहे. सध्या कलर्स मराठी या वाहिनीवरील कुंकू, टिकली आणि टॅटु या मालिकेत त्या ‘जीजी’ ही भूमिका करत होत्या. त्यांच्या अचानक एक्सिटमुळे चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.

शुभांगी जोशी यांचा अल्पपरिचय 

ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी या उत्कृष्ठ आजी होत्या. त्यांनी साकारलेल्या आजीच्या भूमिका साऱ्यांच्याच स्मरणात आहेत. 'काहे दिया परदेस' या मालिकेत त्यांनी साकारलेली गौरीची आजी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. तसेच 'काहे दिया परदेस' या मालिकेत शुभांगी जोशी यांनी मालवणी आजी साकारली होती. त्यांच्या मालवणी भाषेने प्रेक्षकांना अधिक जवळ केलं. 

तसेच 'आभाळमाया' या मालिकेत देखील त्यांनी साकारलेली आजी अतिशय लोकप्रिय होती. आभाळमाया या मालिकेत त्यांनी साकारलेली आजी ही वेगळी होती. अतिशय प्रेमळ अशी आजी घरच्या गोष्टींमध्ये खूप कमी बोलत असे. चिंगी आणि अनु यांची आजी साकारली होती.या मालिकेत त्यांनी आक्काची भूमिका साकारली होती.