'या' अभिनेत्रीने दीपिका-ऐश्वर्यालाही मागे टाकलं, चित्रपटात काम न करताही ठरली भारतातील सर्वात श्रीमंत Actress

Juhi Chawla Net Worth: अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टनुसार भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण अशी यादी समोर आली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 19, 2024, 09:45 AM IST
'या' अभिनेत्रीने दीपिका-ऐश्वर्यालाही मागे टाकलं, चित्रपटात काम न करताही ठरली भारतातील सर्वात श्रीमंत Actress title=
meet 90s actress whose net worth is more than from Deepika Padukone to Aishwarya Rai

Juhi Chawla Net Worth: बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. 90 च्या दशकात अनेक अभिनेत्रींनी या क्षेत्रात पाऊल ठेवले. मात्र, आता त्यातील अनेक अभिनेत्रींनी या क्षेत्रात फारशा दिसत नाहीत. पण 90च्या दशकातील एक अभिनेत्री आहे जी आज सर्वाधिक श्रीमंत आहे. दीपिका पदुकोण, आलिया भट्ट यांच्यापेक्षाही या अभिनेत्रीची जास्त चर्चा असते. ही अभिनेत्री चित्रपटात जरी कमी दिसत असली तरी ती व्यवसायातून चांगली कमाई करते. 

अलीकडेच हुरूनची एक यादी समोर आली होती. ज्यात जुही चावलाचे नाव सर्वात श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट हे. तिची नेटवर्थ 4600 कोटी इतके आहे. जूहीनंतर या यादीत खालोखाल ऐश्वर्या रायचे नाव आहे. 560 कोटी रुपये इतके आहे. ऐश्वर्यानंतर या यादीत प्रियंका चोप्राचे नाव आहे. तिची नेटवर्थ 650 कोटी आहे. दीपिका आणि आलिया तर या यादीत सर्वात मागे आहेत. आलियाची नेटवर्थ 550 कोटी तर दीपिकाचे नेटवर्थ 500 कोटी इतकी आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री अभिनयाबरोबरच ब्रँड अँडोर्समेंटमधून तगडी कमाई करतात. त्याचबरोबर एकीकडे त्यांचा स्वतःचा व्यवसायदेखील आहे. त्यामुळं त्यांच्या नेटवर्थमध्ये मोठी कमाई होते. जुही चावलाबद्दल बोलायचे झाल्यास तिने अनेक बिझनेसमध्ये गुंतवणूक केली आहे. रेड चिली कंपनीची फाउंडर आहे. त्याचबरोबर शाहरुख खानसोबत आयपीएलची टीम कोलकाता नाइट रायडर्स खरेदी केली आहे. या दोन कंपन्यांमधूनच जुहीची तग्गड कमाई होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PTC Punjabi (@ptcpunjabi)

जुही सध्या चित्रपटात फार कमी दिसते. तिचा 2009मध्ये आलेला लक बाय चान्स हा चित्रपट चांगला चालला होता. त्यानंतर आलेल्या सिनेमान मात्र जुहीने सहकलाकाराच्या भूमिका साकारल्या होत्या. मात्र हे चित्रपट फारसे काही कमाल दाखवू शकले नाही.