अंकितासोबतच्या लग्नानंतर पहिल्यांदाच बोलला मिलिंद सोमण...

दोन महिन्यांपूर्वी म्हणजे २२ एप्रिलला मिलिंद सोमण गर्लफ्रेंड अंकिता कुंवरसोबत विवाहबद्ध झाला.

Updated: Jul 24, 2018, 03:40 PM IST
अंकितासोबतच्या लग्नानंतर पहिल्यांदाच बोलला मिलिंद सोमण... title=

मुंबई : दोन महिन्यांपूर्वी म्हणजे २२ एप्रिलला मिलिंद सोमण गर्लफ्रेंड अंकिता कुंवरसोबत विवाहबद्ध झाला. मिलिंद आणि अंकिता यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केल्यानंतर त्यांची रिलेशनची चांगलीच चर्चा होऊ लागली. कारण त्या दोघांच्या वयात २६ वर्षांचे अंतर आहे. पण लोकांच्या म्हणण्याकडे या दोघांनी ही दुर्लक्ष केले आणि कधीच त्यामुळे त्रास करुन घेतला नाही.

मिलिंद म्हणतो...

अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत ५२ वर्षीय मिलिंद पहिल्यांदाच लग्न आणि पत्नीच्या वयाबद्दल बोलला. मिलिंद म्हणाला की, लग्नानंतर काही बदलले आहे, असे वाटले नाही. आमच्यामध्ये सर्व पूर्वीसारखेच आहे. आम्हाला पहिल्यापासूनच माहित होते की, आम्हाला काय करायचे आहे.

त्याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही

अलिबागमध्ये लग्न केल्यानंतर १२ जुलैला स्पेनमध्ये दोघांनी बेअरफूड वेडींग केले. पत्नी आणि आपल्या वयातील अंतराबद्दल मिलिंद म्हणाला की, यामुळे आम्हाला काहीही फरक पडत नाही. वय आमच्यासाठी महत्त्वाचे नाही आहे. 

लग्नानंतरचे फोटोशूट

लग्नानंतर या दोघांनी खास फोटोशूट केले. त्याचा अनुभव शेअर करताना मिलिंद म्हणाला की, आम्हाला एकमेकांसोबत काम करायला आवडते. मग ते कोणतेही फिल्ड असो. त्यामुळे फोटोशूटही खास करण्याचा आम्ही प्रयत्न केला.