लग्नाच्या दिवशीही मिलिंदने न चुकता केले हे काम...

मिलिंद सोमणने दोन दिवसांपूर्वीच आपल्या २५ वर्ष लहान गर्लफ्रेंडसोबत विवाह केला.

Updated: Apr 23, 2018, 06:02 PM IST
लग्नाच्या दिवशीही मिलिंदने न चुकता केले हे काम... title=

मुंबई : ९० च्या दशकातील स्टार आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमणने दोन दिवसांपूर्वीच आपल्या २५ वर्ष लहान गर्लफ्रेंडसोबत विवाह केला. हा विवाह अलिबागमध्ये मराठी रितीरिवाजात पार पडला. आता त्यांच्या हळद, मेंहदी, संगीत आणि लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत आहेत. मिलिंद फिटनेस ऑयकॉन म्हणून ओळखला जातो. त्याच्या फिटनेसची चर्चा परदेशातही होतात. ज्युरिख, स्विट्जरलॅंड मध्ये झालेल्या आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेत त्याने आयर्नमॅनचा किताब पटकवला आहे. ट्रायथलॉन ही जगातील सर्वात कठीण स्पर्धांपैकी एक मानली जाते.

लग्नच्या दिवशीही त्याने हे काम न चुकता केले

मिलिंदला फिटनेसचे इतके वेड आहे की, लग्नाच्या दिवसाची सुरुवातही त्याने ५०१ पुशअप्स मारुन केली. एका मुलाखतीत मिलिंदने सांगितले होते की, तो कधी जिमला जात नाही. जिमला फक्त बॉ़डी बिल्डिंगसाठी जावे. फिटनेस आणि जिमचा काही संबंध नाही.

 

501 pushups ! #preparation #BetterHabits4BetterLife #Fitterin2018 pic: @abhirunning

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

असा असतो दिनक्रम

त्याचबरोबर तो रिफाईंड शुगर, पॅकेट फूड आणि बिस्कीट अजिबात खात नाही. सकाळी नाश्त्याला तो अडीच किलो फळे खातो. तर दुपारी जेवणासाठी घरात बनवलेली खिचडी घेतो. संध्याकाळी सूप, इडली किंवा डोसा हे त्याचे आवडते खाणे आहे.
संध्याकाळी ७ वाजता तो चपाती, डाळ आणि हिरव्या पालेभाज्या असा आहार घेतो. रात्री १०:३०- ११ झोपून सकाळी ५ वाजता उठतो. आठवड्यातून ३-४ दिवस तो रनिंग करतो.

मिलिंद-अंकिताची पहिली भेट

त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल मिलिंद सोमण एका मुलाखतीत बोलला की, तो कधी नाईटक्लबमध्ये जात नाही. पण त्या दिवशी कदाचित त्यासाठी तिथे गेलो होतो. मी नाचत असताना माझी नजर अंकितावर गेली. मी तिला माझा नंबर दिला आणि सांगितले की, तू मला फोन करु शकतेस. त्याच्या दूसऱ्या दिवशी तिचा फोन आला आणि तेव्हापासून आम्ही एकमेकांना भेटत आहोत. 

मिलिंदचे हे दुसरे लग्न

हे मिलिंदचे दुसरे लग्न असून यापूर्वी त्याने फ्रेंच अॅक्ट्रेस Mylene Jampanoi सोबत विवाह केला होता. मात्र ३ वर्षातच ते विभक्त झाले.