बॉलिवुडच्या आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट

२ वर्षांपासून या दोघांमधील नातेसंबंधात तणावास सुरुवात

Updated: Aug 4, 2020, 01:22 PM IST
बॉलिवुडच्या आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट  title=

नवी दिल्ली : बॉलिवुड अभिनेत्री मिनिषा लाबा बराच काळ सिनेसृष्टीपासून दूर आहे. पण आता तिच्या वैयक्तिक आयुष्यातील बातमी समोर आलीय. मिनिषा आणि तिचा पती रयान थाम यांनी घटस्फोट घेतलाय. बॉलिवूड लाईफने यासंदर्भातील वृत्त दिलंय. २ वर्षांपासून या दोघांमधील नातेसंबंधात तणावास सुरुवात झाली. तेव्हापासून हे दोघेही वेगवेगळे राहत होते असे वृत्त आहे. 

Minissha Lamba News in Gujarati, Latest Minissha Lamba news ...

रयान आणि मी वेगळे झालो आहोत. कायदेशीर प्रक्रीया पूर्ण झालीय असे मिनिषाने 'डीएनए'ला सांगितले. मिनिषा आणि रयानच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली होती. २०१३ मध्ये जुहुच्या नाइट क्लब ट्रायलॉजीमध्ये त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. यानंतर त्यांनी एकमेकांना साधारण २ वर्षापर्यंत डेट केलं. त्यानंतर २०१५ ला लग्न केलं. 

Minissha Lamba News in Hindi, Minissha Lamba की लेटेस्ट ...

मिनिषा आणि तिच्या पतीतील नातेसंबंध चांगले चालले नसून ती वेगळी राहत असल्याच्या चर्चा ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरु झाल्या होत्या. पण त्यावेळी तिने यासंदर्भात भाष्य करणे टाळले होते. पण आता या वृत्ताने यावर शिक्कामोर्तब झालंय. 

Minissha Lamba enters matrimony with Ryan Tham | People News | Zee ...

मिनिषाने २००५ मध्ये 'यहा' तून बॉलिवुड पदार्पण केलं. यामध्ये जिमी शेरगिल मुख्य भुमिकेत होता. या सिनेमानंतर तिचं फार कौतुक झालं होतं. तर रयान हा हॉटेल व्यावसायिक आहे.