मुव्ही रिव्ह्यू : रेडू- कोकणात राहणाऱ्या जोडप्याची साधी, निरागस कथा...

बिग स्क्रीनवर सर्वाधिक राज्य पुरस्कार पटकावणा-या रेडू हा सिनेमा प्रदर्शित झालाय.

Updated: May 18, 2018, 04:12 PM IST
मुव्ही रिव्ह्यू : रेडू- कोकणात राहणाऱ्या जोडप्याची साधी, निरागस कथा... title=

जयंती वाघधरे, झी मीडिया

मुंबई : आज बिग स्क्रीनवर सर्वाधिक राज्य पुरस्कार पटकावणा-या रेडू हा सिनेमा प्रदर्शित झालाय. याचबरोबर बच्चे कंपनीसाठी खास ट्रीट म्हणून मंकी बात हा सिनेमाही आज रिलीज झालाय. हॉल्वूडमध्ये रायन रेनल्ड्स स्टारर डेडपूल 2 हा सिनेमाही आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. कसा आहे रेडू हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का..? पाहुया...

कसा आहे सिनेमा?

70च्या दशकातील ही गोष्ट आहे.. एखाद्या वस्तूच्या प्रेमात पडल्यानंतर विशेषत: त्याचे व्यसन लागल्यानंतर काय घडतं असा एक अनोखा आणि मजेशीर प्रवास या सिनेमात दिग्दर्शक सागर वंजारी यांनी रेखाटला आहे. अभिनेत्री छाया कदम, शशांक शेंडे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या रेडू या सिनेमाची गोष्ट आहे रेडियेच्या प्रेमात पडलेल्या गावात्या तातू य़ा व्यक्तीची.. 

साधी, निरागस कथा

कोकणात राहणा-या एका जोडप्याची ही कहाणी आहे. कष्ट करुन दोन वेळची भाकरी कमावणा-या या जोडप्याचे अगदी जवळचे पाहुणे घरी येतात.. पाहुणे आपल्यासोबत येताना रेडियो घेउन येतात, ज्याला गावातली लोक रेडू म्हणतात.. मग काय या रेडू अर्थातच रेडियोच्या प्रेमात असणा-या तातूला रेडूचं एक वेगळंच व्यसन लागतं. तो रेडूशिवाय राहुच शकत नाही. परत जाताना हा पाहुणा तातूला रेडू भेट म्हणून देतो.. तातूचा आनंद गगनात मावेना.. मग अचानक कहानी मे ट्विस्ट.. तातूचा रेडियो चोरी होतो. 

काय आहेत त्रुटी?

दिग्दर्शक सागर वंजारीचा हा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा.. या सिनेमातील गोष्ट खूपच साधी आणि निरागस आहे आणि ती तितक्याच निरागस पद्दतिनं मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक सागर वंजारी यांनी केलाय. रेडूची कथा पटकथा आणि संवाद लिहलेत संजय नवगिरे यांनी.. कथा उत्तम असली तरी पटकथेत काही त्रुटी जाणवतात.. सिनेमाचा शेवटचही खटकतो, कुठेतरी तो जस्तिफाय होताना दिसत नाही... सिनेमातील लोकेशन्स अप्रतिम आहेत, सिनेमाटोग्राफर मंगेश गोडकर यांनी ते उत्तम टिपण्याचा प्रयत्न केलाय.. सिनेमाचं संगीतही छान झालंय.

मिळाले इतके स्टार्स

अभिनेता शशांक शेंडे आणि छाया कदम या दोघांनी आपल्या व्यक्तिरेखा उत्तम पार पाडल्या आहे. शशांक शेंडे हे खरंतर पश्चिम महाराष्ट्राचे मात्र सिनेमात त्यांनी भूमिका एका मालवणी माणसाची साकारली आहे. मालवणी भाषा, त्याचं उच्चारण, ती शैली त्यांनी उत्तम पार पाडली आहे. हा पुर्ण सिनेमा मालवणी भाषेतच असला तरी ती समजण्यात सोपी आहे.. खरंतर या भाषेमुळे सिनेमात तो निरागस भाव आणि गोडवा जाणवतो.. 
अभिनेत्री छाया कदमनं आपल्या बोलीपासून दिसण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घेतलीये.. न्यूडनंतर या सिनेमासाठीही तिच्या अभिनयाचं कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही. रेडू या सिनेमातील हे सगळे पैलू पाहता या सिनेमाला 3.5 स्टार्स.