'तुम मेरी लाश पर से...', आईचं हे वक्तव्य ऐकून हेलावलं पंचम दांचं मन

कुटुंबाच्या विरोधाचाही सामना करावा लागला होता.   

Updated: Oct 18, 2021, 11:49 AM IST
'तुम मेरी लाश पर से...', आईचं हे वक्तव्य ऐकून हेलावलं पंचम दांचं मन
छाया सौजन्य- सौशल मीडिया

मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि संगीतकार आर.डी. बर्मन या दोघांनाही वेगळ्यानं ओळख करुन देण्याची गरज नाही. हिंदीच चित्रपट विश्वामध्ये आपल्याच शैलीवर रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी ही जोडी. पंचम दा आणि आशा भोसले यांच्या नात्याच्या कायमच सर्वदूर चर्चा झाल्या. मुळात या दोन्ही कलाकारांना एकत्र येण्यासाठी समाजासोबतच कुटुंबाच्या विरोधाचाही सामना करावा लागला होता. 

पहिल्या लग्नामध्ये झालेल्या त्रासानंतर आशा भोसले यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांनी त्याच्या तिसऱ्या बाळाला जन्म दिला. संगीतक्षेत्रात आर.डी आणि आशा भोसले यांनी अनेक सुपरहिट गाणी दिली. ज्यानंतर या जोडीमध्ये जवळीक वाढली आणि त्यांनी हे नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला. पण, आशा भोसले यांचं वय, तीन मुलं आणि पहिल्या लग्नाचील प्रसंग या सर्व गोष्टी अडचणी निर्माण करत होत्या. 

घटस्फोटित आशा भोसले यांच्याशी लग्नगाठ बांधण्याचं स्वप्न पंचम पाहत होते. पण, त्यांची आई मात्र याविरोधात होती. ते आईकडे या लग्नासाठी परवानगी मागण्यासाठी गेले तेव्हा, 'जेव्हापर्यंत मी जीवंत आहे तोपर्यंत हे लग्न होणार नाही. तुला हवं असल्यास माझ्या मृतदेहावरुन आशाला या घरात आण' अशा शब्दांत त्यांनी मुलाला विरोध केला होता. 

असं म्हटलं जातं की, आईकडून मन हेलावणारे हे शब्द ऐकल्यानंतर बर्मन तेथून निघून गेले  होते. ज्यानंतर त्यांनी आशा भोसले यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली होती.