मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्याची शिस्त, वेळ पाळण्याची सवय, नियम आणि फिटनेससाठी ओळखला जातो.
अक्षय आपल्या मुलांशी खेळकर वृत्तीने वागतो. त्याचे असे म्हणणे आहे की, आपण मुलांवर कोणत्याही गोष्टीचा दबाव टाकू शकत नाही. त्यामुळे एखाद्या गोष्टीसाठी त्याच्यावर सातत्याने दबाव टाकणे किंवा एखादी गोष्ट सारखी सारखी सांगणे चुकीचे आहे. तर तुमच्या वागण्यातून तुम्ही मुलांवर संस्कार करा.
तुम्हाला पाहुन त्यांना स्वतःला चांगल्या गोष्टींचे महत्त्व पटायला हवे. वेळेवर उठणे, कोठेही जाताना वेळेवर जाणे महत्त्वाचे आहे त्यामुळेच तुमची कामे वेळेवर पूर्ण होतात. आयुष्यात या गोष्टीचे महत्त्व अक्षयला त्याच्या वडीलांनी शिकवले होते. माझ्या याच सर्व गोष्टी माझ्या मुलांनीही शिकाव्या अशी माझी इच्छा असल्याचे अक्षय म्हणाला. माझ्या शिस्तप्रियते आणि फिटनेसमुळेच मी एका वेळी चार चित्रपट आणि इतर कामही करू शकतो.
लवकरच अक्षयचा पॅडमॅन हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याची निर्मिती ट्विंकल खन्नाने केली आहे. अलिकडेच त्याच्या आगामी चित्रपट केसरीचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. अक्षयने चित्रपटाच्या चित्रिकरणालाही सुरूवात केली आहे.