मुंबई : बॉलिवूड कपल अंगद बेदी आणि नेहा धुपिया या दोघं दुसऱ्यांदा पालक झाले आहेत. नेहा धुपियाने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. नेहा धुपियाला मुलगा झाला आहे. याबाबतची माहिती अंगदने सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याने म्हटलं की, घरी लहान पाहुणा आल्याचं म्हटलं आहे.
अंगद बेदीने पत्नी नेहा धुपियाचा फोटो शेअर करत म्हटलं,'परमेश्वराच्या कृपेने आज आमच्या घरी मुलाचा जन्म झाला आहे. नेहा आणि बेबी दोघंही ठिक आहेत. मेहर आपलं 'बेबी' हे टायटल नवीन बाळाला देण्यास उत्सुक आहे. नेहा धुपिया या प्रवासात योद्धा सारखी होती. तिचे आभार'
काही महिन्यांपूर्वी नेहा धुपिया आणि अंगद बेदीने दुसऱ्यांदा पालक होण्याची घोषणा केली होती. दोघांनी फॅमिली फोटो शेअर केला होता. लवकरच ते तिघांवरून चार होणार आहे. याबातमीनंतर सगळीकडे त्यांची जोरदार चर्चा रंगली.
नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांना मोठी मुलगी आहे. मुलीचे नाव मेहेर आहे. तिचा जन्म 2018 मध्ये झाला. नेहा धुपिया लग्नाअगोदरच प्रेग्नेंट असल्याची चर्चा होती. नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांचं 2018 साली दिल्लीतील एका गुरूद्वारात लग्न झालं. हे लग्न अतिशय खासगी पद्धतीने झालं. ज्यानंतर सगळ्यांना याची माहिती मिळाली.
दोघांच्या लग्नाचा खुलासा होताच चाहत्यांना मोठा धक्का होता. अगदी कलाकारांसाठी देखील ही बातमी नवीन होती. अंगद आणि नेहा एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघांमध्ये प्रेम होतं याबाबत फार कुणाला माहित नव्हतं. नेहा आणि अंगद सुरुवातीपासूनच एकमेकांना साथ देत आहेत. नुकतेच नेहा धुपियाने सांगितले, की तिला गरोदरपणामुळे अनेक प्रोजेक्टमधून बाहेर पडावे लागले होते. यावर अंगद म्हणाला की, हा इंडस्ट्रीचा एक भाग आहे.