IC814 Controversy : 1999 मध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना हरकत-उल-मुजाहिदीनद्वारे इंडियन एअरलाइन्स विमानाच्या हायजॅकवर वेबसिरीज तयाप केली आहे. वेब सीरिज IC814 वरुन पुन्हा एकदा वाद सुरु झाला आहे. सरकारने नेटफ्लिक्सच्या भारतीय कंटेंट हेडला समन्स पाठवला आहे.
शेकडो सोशल मीडिया युझर्सनी वेब सिरीजच्या निर्मात्यांनी अपहरणकर्त्यांची नावे जाणूनबुजून बदलून "भोला" आणि "शंकर" ठेवल्याचा आरोप केल्यानंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे हे समन्स पाठवले आहेत. नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट हेड मोनिका शेरगिल यांना वेब सिरीजच्या वादग्रस्त पैलूंवर स्पष्टीकरण देण्यासाठी मंगळवार, 2 सप्टेंबर रोजी त्यांच्यासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही वेब सीरिज अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शित केली आहे आणि फ्लाइट कॅप्टन देवी शरण आणि पत्रकार श्रींजय चौधरी यांच्या 'फ्लाइट टू फियर: द कॅप्टन्स स्टोरी' या पुस्तकावरून ती प्रेरित आहे.
सोशल मीडियावर याबाबत अनेक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. ही वेब सीरिज एका सत्य घटनेवर आधारीत आहे. याचा विचार करुन वेब सीरिजमध्ये काही गोष्टींचा अवलंब केला पाहिजे. या वेब सीरिजच्या सुरुवातीलाच सांगण्यात आलंय की, IC 814: The Kandahar Hijack Story हायजॅक केलेल्या कॅप्टन देवी शरण यांच्या पुस्तकावर आधारित आहे. या पुस्तकाला आतापर्यंत 24 वर्षे झाले आहे. हे पुस्तक हजारो लोकांनी खरेदी करुन त्यांनी वाचलं देखील असेल.
काठमांडू वरुन जे विमान दिल्लीत जात होत त्यामधील दहशतवाद्यांनी लोकांचा संभ्रम निर्माण करण्यासाठी कोडनावांचा उल्लेख केला होता. ज्याचा वापर या वेब सीरिजमध्ये करण्यात आला आहे. जसे की, चिफ, डॉक्टर, बर्गर, भोला आणि शंकर. शेवटच्या दोन नावांवर हिंदू प्रेक्षकांनी विरोध दर्शवला आहे. दहशतवाद्यांनी आपली स्वतःची ओळख लपवण्यासाठी अशा पद्धतीच्या नावांचा उल्लेख केला आहे, पुस्तकामध्ये याबाबत उल्लेख केला आहे.