Nick Jonas and Priyanka Chopra : निक प्रियांकाला रात्रभर झोपू देत नाही? देसी गर्लने केला गौप्यस्फोट

 देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या आयुष्यात काय सुरु आहे? प्रियांका आणि निकमध्ये काही बिनसलं का? निक आणि प्रियांकाला यांच्या बाळाबद्दल सर्वांना प्रचंड उत्सुकता असते. 

Updated: Sep 20, 2022, 07:43 PM IST
Nick Jonas and Priyanka Chopra : निक प्रियांकाला रात्रभर झोपू देत नाही? देसी गर्लने केला गौप्यस्फोट

Desi Girl Priyanka Chopra And Nick Jonas Bebroom secret : देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या आयुष्यात काय सुरु आहे? प्रियांका आणि निकमध्ये काही बिनसलं का? निक आणि प्रियांकाला यांच्या बाळाबद्दल सर्वांना प्रचंड उत्सुकता असते. आपण सर्वजण प्रियांका आणि निक यांना इन्स्टा फेसबुक (Instagram Facebook) आणि इतर सर्व सोशल मीडिया प्लँटफॉर्म्सवर (Social Media Platform) फॉलो करतो. त्यांची फॅशनही आपण कॉपी करण्याच्या प्रयत्न करतो.अशात निक जोनास आणि प्रियांका चोप्रा यांच्या खासगी आयुष्याबाबत(Private life of Priyanka and nick), अगदी त्यांच्या बेडरूममधील एक गोष्ट बाहेर आली आहे. स्वतः प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी एका मुलाखतीत याचा खुलासा केल्याचं समजतं. 

प्रियांकाच्या या सिक्रेटबाबत जाणून घेणारच आहोत. पण त्याआधी प्रियांका चोप्राने नुकत्याच संयुक्त राष्ट्रसभेत केलेल्या भाषणाचीही सर्वत्र चर्चा आहे. "आपल्या जगात सर्वकाही ठीक नाही" असं मत प्रियांका चोप्राने संयुक्त राष्ट्रसभेच्या भाषणात मांडल्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. या भाषणात प्रियांका चोप्रा हीने सध्याची जागतिक परिस्थिती, नैसर्गिक संकटे, गरिबी, उपासमारी, असमानता,  कोविड-19 चे परिणाम याबाबत भाष्य केलं. प्रियांका चोप्राने अमांडा गोरमन आणि मलाला युसुफझाई यांच्यासोबत भाषण केलं. 

इन्स्टा पोस्ट : 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचं ते सिक्रेट 

निक जोनास याला मधुमेह आहे (Nick Jonas was diagnosed with type 1 diabetes). अशात रात्रीच्या वेळीही निक याची शुगर लेव्हल (Sugar Level) रात्रीच्या वेळीही तपासावी लागायची. स्वतः निक जोनास याबाबतीत प्रचंड सजग आणि संवेदनशील आहे. प्रियांकाही निकची याबाबतीत प्रचंड काळजी घेत असल्याचं समजतं. याबाबत बोलताना निक जोनासमुळे रात्रीची झोप होत नसल्याचं प्रियांका बोलली होती.