KBC 13 : 'ये तेरे बाप का....', बिग बींसमोर नीरज चोप्रा हे काय म्हणाला?

आज हमलोग आए हैं..... 

Updated: Sep 15, 2021, 08:41 AM IST
KBC 13 : 'ये तेरे बाप का....', बिग बींसमोर नीरज चोप्रा हे काय म्हणाला?
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्रा आणि कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या हॉकी संघातील गोलकिपर पी.आर. श्रीजीश या दोघांनही 'कौन बनेगा करोडपती 13' या कार्यक्रमाच्या मंचावर नुकतीच हजेरी लावली. यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी दोन्ही खेळाडूंनी दिलखुलास गप्पा मारल्या, तर त्यांना हरयाणवी भाषाही शिकवल्याचं पाहायला मिळालं. 

या दोन्ही खेळाडूंनी बच्चन यांना हरयाणवी भाषेचे धडे दिले. 'आज हमलोग आए हैं, दोनो आपको हरयाणवी सिखाणे', असं श्रीजीश म्हणाला. त्यावर 'हे भगवान', असं म्हणत बच्चन यांनी विनोदी अंदाजात उत्तर दिलं. 

भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं यावेळी अमिताभ बच्चन याच्या 'झंजीर' या चित्रपटातील एक डायलॉगही ट्रान्सलेट केला. 'ये पोलीस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नही... ', या डायलॉगला आपल्याच शैलीत म्हणत नीरजने सर्वांचीच मनं जिंकली. 'ये तेरे बाप का घर कोनी, थाना है. चुपचाप खडा रेह', असं तो म्हणाला. हरयाणवी भाषेचा हा बाज ऐकून अनेकांच्याच चेहऱ्यावर हसू आलं. 

सोनी टीव्हीकडून अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून या भागाचा एक प्रोमो शेअर करण्यात आला. जिथं त्यांची ओळख करुन देताना बिग बी अमिताभ बच्चन यांचा उत्साहसुद्धा द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळालं.