पाकिस्तानात पॅडमॅन सिनेमावर बंदी

  ९ फेब्रुवारीला देशासह जगभरात रिलीज झालेला पॅडमॅन खूप चांगली कमाई करत आहे. सुरूवातीच्या २ दिवसातच सिनेमाने २३.९४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. दरम्यान पाकिस्तानने या सिनेमाला बॅन केलंय. पाकिस्ताने 'फेडरल संघीय बोर्डा'ने या सिनेमावर बंदी घातलीयं. 

Updated: Feb 11, 2018, 11:34 PM IST
पाकिस्तानात पॅडमॅन सिनेमावर बंदी  title=

नवी दिल्ली :  ९ फेब्रुवारीला देशासह जगभरात रिलीज झालेला पॅडमॅन खूप चांगली कमाई करत आहे. सुरूवातीच्या २ दिवसातच सिनेमाने २३.९४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. दरम्यान पाकिस्तानने या सिनेमाला बॅन केलंय. पाकिस्ताने 'फेडरल संघीय बोर्डा'ने या सिनेमावर बंदी घातलीयं. 

संस्कृतीच्या विरोधात 

 महिलांच्या मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेशी संबंधित कहाणीवर 'पॅडमॅन' आधारित आहे. 

आमच्या परंपरा आणि संस्कृतीच्या विरोधात असलेल्या सिनेमाच्या स्क्रिनिंगची परवानगी आम्ही देऊ शकत नाही असे पाकच्या फेडरलल बोर्डाने सांगितले. 

'पद्मावत'पण नको 

 फक्त 'पॅडमॅन'च नाही तर 'पद्मावत'पण पाकिस्तानात नको असे सिने निर्माता सैयद नूर यांनी सांगितले. यामध्ये मुस्लिमांना नकारात्मक रुपात दाखविल्याचे त्यांचे म्हणणे आहे.