मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आणि फॅशन यांचा जवळचा संबंध आहे. बॉलीवूडमधील अभिनेत्रींकडून आपल्याला रोज काही नवीन फॅशन पाहायला मिळते. परंतु तुम्ही हे देखील पाहिलं असेल की, फॅशन एक्प्रिमेंट करणं या अभिनेत्रींना महागात पडलं आहे, ज्यामुळे त्यांना चार-चौघांमध्ये लाजिरवाणा प्रसंग ओढावला आहे. अशीच एक घटना बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत घडली आहे.
प्रियांका बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत तिच्या फॅशनसाठी प्रसिद्ध आहे आणि ती नेहमीच नवनवीन स्टाईलमध्ये दिसत असते.
प्रियांका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, तसेच ती तिच्या ड्रेसिंग सेन्स देखील ओळकली जाते, ती अनेकदा सोशल मीडियावर असे फोटो टाकते ज्यामध्ये तिची फॅशन पाहून लोक वेडे होतात, मात्र कधी-कधी तिला फॅशनमुळे लाजिरवाणे व्हावे लागते.
प्रियंका अनेकदा अवॉर्ड शोमध्ये दिसत असते जिथे ती खूप फॅशनेबल ड्रेसमध्ये येते. अशाच एका अवॉर्ड शोमध्ये ती ब्लॅक बॉडीकॉन स्टाइलचा ड्रेस घालून पोहोचली होती. तिच्या ड्रेसला एका बाजूला डीप कट होता आणि तिथे जाळी लावली होती, त्यामुळे तिच्या शरीराचा बराचसा भाग स्पष्ट दिसत होता.
परंतु जेव्हा ती फोटो काढून झाल्यानंतर फिरली तेव्हा मात्र ती opps मोमेंटला बळी पडली. कारण तिच्या शरीराचा थोडासा भाग दिसला. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहे.
प्रियंकानंतर हाताने आपला ड्रेस सेट करुन आपलं शरीर झाकताना दिसली. तिची opps मोमेंटला बळी पडण्याची ही पहिलीच वेळ नाही, प्रियंका अनेकदा तिच्या ड्रेसमुळे opps मोमेंटची शिकार झाली आहे.