'जोरू का गुलाम' नेटकऱ्यांकडून प्रियंका - निक ट्रोल

अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनास मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होताना दिसत आहे. 

Updated: May 19, 2019, 06:37 PM IST
'जोरू का गुलाम' नेटकऱ्यांकडून प्रियंका - निक ट्रोल

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनास मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होताना दिसत आहे. 'मेट गाला २०१९'मध्ये प्रियंका तिच्या हटके अवतारामुळे नेटक-यांच्या ट्रोलचा विषय ठरली होती. बॉलिवूडमध्ये सध्या 'कान' फेस्टिवलचे वारे वाहताना दिसत आहेत. प्रियंकाने  यंदाच्या ७२व्या वर्षी 'कान फिल्म फेस्टिवल'मध्ये डेब्यू केले. तिच्या सोबत पती निक जोनासने रेड कार्पेटवर आपला अंदाज दाखवला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Mon amour

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

प्रियंकाने तिच्या चौथ्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. फोटोमध्ये निक छत्री घेवून उभा असलेला दिसत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तो प्रियंकाचा पावसापासून बचाव करताना दिसत आहे. त्यांचा हा फोटो काही यूजर्सला चांगलाच भोवला आहे. तर काही नेटकऱ्यांनी प्रियंका आणि निकच्या फोटोला ट्रोल केले.

एका यूजरने 'तेरी तो लग गई, तू तो जोरू का गुलाम हो गया हैं.' असे म्हणत प्रियंका आणि निकला ट्रोल केले आहे. 'कान फिल्म फेस्टिवल'मध्ये प्रियंकाच्या कपड्यांची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. 

पहिल्या दिवशी प्रियंका काळ्या रंगाचा गाऊन आणि पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फेस्टिवलमध्ये झळकली होती. दुसऱ्या दिवशी हिरव्या रंगातील तिचा ड्रेस चांगलाच व्हायरल झाला होता. 
तिसऱ्या दिवशी प्रियंका पर्पल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली होती. तर चौथ्या लूकमध्ये प्रियंकाच्या राजकुमारीच्या पांढऱ्या गाऊनवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.