Good News : प्रियांका चोप्रा जोनासच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज लवकरच अभिनेत्री...

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री प्रियांका चोप्रा खूप चर्चेत आहे. नेहमीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. कायम आपले फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. 

Updated: Apr 8, 2023, 09:24 PM IST
Good News : प्रियांका चोप्रा जोनासच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज लवकरच अभिनेत्री... title=

मुंबई : प्रियांका चोप्रा जोनास सध्या कुटुंबासह भारतात आली आहे सध्या ती तिच्या आगामी  Citadel चं जोरदार प्रमोशन करत आहे. रुसो ब्रदर्सच्या 'सिटाडेल' या सिरीजचा प्रीमियर कार्यक्रमही नुकताच पार पडला.  प्रियांका चोप्रा तिचा को-स्टार रिचर्ड मॅडेनसोबत 'सिटाडेल'च्या प्रीमियरला पोहोचली होती.

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री प्रियांका चोप्रा खूप चर्चेत आहे. नेहमीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. कायम आपले फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. कधी ती तिच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते, तर कधी ती सिनेमाच्या पोस्ट शेअर करते. नेहमीच ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आता अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे आणि तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून प्रियांका  Citadel च्या जाहिरातींबद्दल सोशल मीडियावर चर्चेत आहे. या सर्व बातम्यांदरम्यान आता प्रियांका चोप्राने तिच्या आगामी हॉलिवूड सिनेमाची घोषणा केली आहे. तिच्या नवीन हॉलिवूड प्रोजेक्टची घोषणा केली आहे. प्रियांका चोप्राने पोस्ट शेअर केली की, ती आता जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांच्यासोबत हेड्स ऑफ स्टेटमध्ये दिसणार आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहते त्यांचे अभिनंदन करताना दिसत आहेत.

नुकताच प्रियांकाने तिच्या सोशल मीडियावर डेडलाइनच्या अहवालाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. याबरोबरच तिने 'ऑन टू द नेक्स्ट' असं कॅप्शन देखील दिलं आहे. तर पोस्टमध्ये लिहीलं आहे की, 'प्रियांका चोप्रा अभिनेता इद्रिस एल्बा आणि जॉन सीनासोबत काम करणार आहे'. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता इद्रिस एल्बा आणि जॉन सीनासोबत काम करणार आहे. रिपोर्टनुसार, प्रियंका चोप्राचा आगामी हॉलिवूड चित्रपट  मे महिन्यात मजला गाठणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नुकताच प्रियांकाच्या सिटाडेल सिरीजच्या प्रिमीयरला अभिनेता वरुण धवनही प्रीमियरला पोहोचला होता. यासोबतच दिग्गज अभिनेत्री रेखा, सान्या मल्होत्रा, नोरा फतेही, नेहा धुपियासह अनेक सेलेब्स सहभागी झाले होते. प्रियांका चोप्राचा सिटाडेल 28 एप्रिलला Amazon Prime Video वर रिलीज होणार आहे.