डॉन ३ मध्ये प्रियंकाऐवजी लागणार 'या' अभिनेत्रीची वर्णी!

 बॉलिवूडचा बादशाहा शाहरूख खानच्या डॉन चित्रपटाची सीरीज ६ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाली होती. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 24, 2017, 05:16 PM IST
डॉन ३ मध्ये प्रियंकाऐवजी लागणार 'या' अभिनेत्रीची वर्णी! title=

नवी दिल्ली : बॉलिवूडचा बादशाहा शाहरूख खानच्या डॉन चित्रपटाची सीरीज ६ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाली होती. आता लवकरच शाहरूख डॉन ३ मधून प्रेकक्षांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे शूटींग देखील सुरू झाले आहे. 

मात्र पहिल्या दोन पार्टमध्ये झळकलेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा पुढच्या पार्टमध्ये दिसणार नाही. मग प्रियंकाची जागा कोण घेणार ? 

प्रियंकाची जागा कोण घेणार ? 

डेक्कन क्रॉनिकलच्या वृत्तानुसार शाहरुख आणि प्रियंकामधील कोल्ड वॉर अजूनही संपलेला नाही. त्यामुळेच ती आपल्याला फरहान अख्तरच्या 'डॉन 3' मध्ये दिसणार नाही. म्हणून सध्या निरमाते जंगली बिल्लीच्या शोधात आहेत. मात्र यात दीपिकाची वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे.

Deepika Padukone

मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख आणि प्रियंकामधील वाद मिटवण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला. मात्र काही फायदा झाला नाही. डॉन सीरीजमधील शाहरुख मुख्य कलाकार असल्याने त्याला न हटवता चित्रपटातील हीरोईनला बाहेरचा रस्ता दा्खवण्यात येईल. आणि त्याऐवजी दीपिकाला साईन करण्याची दाट शक्यता आहे.