VIDEO : अखेर दिलजीत दोसांजला 'ती' भेटलीच; बॉलिवूड सेलिब्रिटी म्हणतात...

खासगी आयुष्याविषयी दिलजीत फारसा मोकळेपणाने बोलत नाही. पण..... 

Updated: May 22, 2019, 01:31 PM IST
VIDEO : अखेर दिलजीत दोसांजला 'ती' भेटलीच; बॉलिवूड सेलिब्रिटी म्हणतात...

मुंबई : पंजाबी चित्रपटसृष्टीत नावारुपास आल्यानंतर हिंदी कलाविश्वात आपली अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेता दिलजीत दोसांज याचं खासगी आयुष्य तसं गुलदस्त्यातच असतं. आपल्या खासगी आयुष्याविषयी फारसा व्यक्त न होणारा दिलजीत कायली जेनेर या अमेरिकन मॉडेलवर असणारं त्याचं प्रेम व्यक्त करण्यास मात्र कधीच चुकत नाही. याचीच प्रचिती त्याच्या 'छडा' या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. 

खऱ्या आयुष्यात कायलीवर असणारं प्रेम व्यक्त करत तिला जीवनाची सलाथीदार बवनू पाहण्याची स्वप्न पाहणारा दिलजीत चित्रपटाच्या निमित्ताने काही अंशी यशस्वी झाल्याचं पाहायला मिळत आहे. कायलीची सोशल मीडिया पोस्ट म्हणू नका किंवा मग अतर कोणत्या मार्गाने तिच्याविषयीचं प्रेम व्यक्त करण्याचा दिलजीतचा अनोखा अंदाज म्हणू नका, चर्चा ही होतेच. त्यामुळे 'छडा'चा ट्रेलर पाहता अखेर कायली त्याला भेटलीच, असं म्हणायला हरकत नाही. आता ती नेमकी कोणत्या रुपात भेटली आहे, हे मात्र ट्रेलर पाहूनच तुम्ही पाहू शकता. 

दिलजीत दोसांज आणि नीरू बाजवा यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर अस्सल पंजाबी शैलीत असल्यामुळे हा 'देसी स्वॅग' चाहत्यांची मनंही जिंकत आहे. मुख्य म्हणजे फक्त चाहतेच नव्हे तर, बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा य़ा विनोदी ट्रेलरची प्रशंसा करत आहेत. 

अक्षय कुमार, वरुण धवन आणि अर्जुन कपूर यांनी ट्विट करत दिलजीतच्या छडा या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रशंसा केली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनीही #Shadaa या हॅशटॅगअंतर्गत सरदारजी दिलजीतच्या चित्रपटाप्रती कुतूहलाची भावना व्यक्त केली आहे. 'छडा'च्या निमित्ताने दिलजीत पुन्हा एकदा नीरू बाजवासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहता येणार आहे. तेव्हा आता 'छ़डा'च्या ट्रेलरप्रमाणेच चित्रपटही विक्रमी कमाईचे आकडे गाठतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.